xiaomi redmi note 9 pro : Redmi Note 9 Pro स्मार्टफोनचा आज भारतात दुसरा सेल – xiaomi redmi note 9 pro second sale today in india on amazon and mi com know features and offers

[ad_1]

नवी दिल्लीः शाओमीच्या Redmi Note 9 Pro या स्मार्टफोनचा आज दुसरा सेल भारतात सुरू होणार आहे. या फोनचा पहिला सेल १७ मार्च रोजी करण्यात आला होता. या फोनला उदंड प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या ९० सेकंदात हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला होता. शाओमी इंडिया कंपनीचे व्यवस्थापक मनु कुमार जैन यांनी ट्विट करून भारतीय ग्राहकांना धन्यवाद देणारे ट्विट केले होते. आज दुसरा सेल सुरू होणार असून हा सेल Amazon, Mi.com, Mi Home, Mi Studio या ऑनलाइन साइटवर उपलब्ध असणार आहे.

Redmi Note 9 Pro खरेदीवर मिळणार ऑफर्स

आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरूवात होणार आहे. फ्लॅश सेलमध्ये एचडीएफसीच्या कार्डवरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास किंवा ईएमआयवरून हा फोन खरेदी केल्यास युजर्संना १ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तसेच एअरटेल युजर्संना २९८ रुपये आणि ३९८ रुपयांच्या रिचार्जवर डबल डेटा देण्यात येणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही मिळणार आहे. या दोन्ही ऑफर्स अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत.


Redmi Note 9 Pro ची खास वैशिष्ट्ये

रेडमी नोट ९ प्रोच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला अॅमेझॉन इंडिया, एमआय होम स्टोर्स, एमआय डॉट कॉम वरून खरेदी करता येऊ शकते. हा स्मार्टफोन ऑरोरा ब्लू, ग्लेसियर व्हाइट आमि इंटरस्टेलर ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे. रेडमी नोट ९ प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. रेडमी नोट प्रो मॅक्सप्रमाणे नोट ९ प्रोमध्येही ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या फास्ट चार्जिंगसाठी १८ वॅटचा चार्जर दिला आहे.

रेडमी के ३० प्रो स्मार्टफोन आज लाँच होणार

जिओ ग्राहकांना करोनाचे प्रत्येक अपडेट मिळणार

Whatsappचं नवं फीचर, फेक मेसेज तुम्हीच ओळखा

व्होडाफोनचाही ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान; ५ नवे प्लान



[ad_2]

Source link

Leave a comment