[ad_1]
याआधी कंपनीने शाओमी एमआय१० स्मार्टफोनचा पहिल्या सेलचे आयोजन केले होते. १४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या सेलमध्ये ६० सेकंदात हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. या सेलमध्येही २०० कोटी रुपयांच्या फोनची विक्री झाली होती. परंतु, Mi 10 Pro ने ५ सेकंदाची कमी नोंद करून हा विक्रम रचला आहे.
Xiaomi Mi 10 Pro ची किंमत
शाओमीचा आणखी एक स्मार्टफोन Xiaomi Mi 10 Pro चा ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५० हजार रुपये तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. १२ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६० हजार रुपये असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
शाओमी Mi 10 चे वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. 90Hz रिफ्रेश रेटचा हा डिस्प्ले पंच होल डिझाइन सह देण्यता आला आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सल, १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, दोन मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ८के रिझॉल्यूशनचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये ४७८० एमएमएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी ३० वॅट वायर आणि वायरलेस दोन्ही चार्जिंगला सपोर्ट करते. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचे फीचर दिले आहे.
शाओमी Mi 10 Pro चे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस HDR10+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz चा रिफ्रेश रेटसोबत दिला आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सल आहे. यात २० मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, एक १२ मेगापिक्सलचा आणि एक ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा दिला आहे. फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. फास्ट चार्जिंगसाठी 50W वायर आणि 30W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचे फीचर देण्यात आले आहे.
64MP सॅमसंग Galaxy A71 आज लाँच होणार
[ad_2]
Source link