WhatsApp : WhatsAppची मोठी घोषणा, मेसेज फॉरवर्डवर बंदी – whatsapp reduces forward message limit to one chat at time to curb fake news during coronavirus

[ad_1]

नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर करोना व्हायरसच्या ज्या पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. अशा फेक बातम्यांची व्हॉट्सअॅपने गंभीर दखल घेतली आहे. करोना संदर्भातील बातम्या, व्हिडिओ, फोटोमधून अफवा पसरवल्याने व्हॉट्सअॅपने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपने एकाचवेळी पाच जणांना मेसेज फॉरवर्डींग करण्यात येत असलेल्या मेसेजवर मर्यादा आणली आहे. युजर्स आता केवळ एकाच व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड करू शकणार आहे. याआधी एकाचवेळी पाच व्यक्तींना मेसेज पाठवता येवू शकत होता.

करोना व्हायरसः फेक बातमी, फोटो, व्हिडिओ असं ओळखा

करोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना व्हॉट्सअॅपवर काही जण जाणीवपूर्वक मेसेजमधून फेक बातम्या व्हायरल करीत आहेत. या फेक बातम्या पसरू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.


याआधी फेसबुकने फेक न्यूज रोखण्यासाठी असाच धाडसी निर्णय घेतला होता. तर गुगलने खोट्या रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. तसेच मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरनेहे खोट्या बातम्या रोखण्यासाठी फिल्टर करणे सुरू केले आहे. व्हॉट्सअॅपने घेतलेल्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक होत आहे. कंपनीचा हा निर्णय चांगला आहे. सध्या जगभरात करोनाची भीती पसरली आहे. सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हॉट्सअॅपचा वापर होतो. दिवसभरात लाखो लोक लाखो मेसेज एक दुसऱ्यांना पाठवत असतात. त्यात काही लोक जाणीवपूर्वक एकाचवेळी फेक मेसेज फॉरवर्ड करीत असतात. त्यांना रोखण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. भारतात ४० कोटीहून अधिक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात.

Vivo Y50 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स



[ad_2]

Source link

Leave a comment