[ad_1]
सध्या व्हॉट्सअॅपवर आधारित अनेक अँड्रॉयड अॅप उपलब्ध आहेत. या अनधिकृत (फेक) व्हॉट्सअॅप मध्ये अनेक असे फीचर्स मिळतात. जे खऱ्या व्हॉट्सअॅपमध्ये सुद्धा मिळत नाही. म्हणजेच, GBWhatsApp नावाच्या एका फेक व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सला स्टेट्सला डिलिट केल्यानंतरही ते पाहता येऊ शकते. जगातील काही भागात हे फेक व्हॉट्सअॅप खूप प्रसिद्ध आहेत. हे इतके प्रसिद्ध आहेत की, अधिकृत पेक्षा फेक अॅपला लोकांची जास्त पसंती आहे. या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आफ्रिका मार्केटमध्ये व्हॉट्सअॅपच्या तुलनेत GBWhatsApp हे जास्त प्रसिद्ध आहे. तसेच YoWhatsApp आणि FMWhatsApp नावाचे दोन अन्य अनधिकृत व्हॉट्सअॅपला लोकांची पसंती आहे. हे दोन्ही अॅप नायजिरिया, केनिया आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशात प्रसिद्ध आहे. व्हॉट्सअॅपने फेक अॅप ब्लॉक करण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, व्हॉट्सअॅपला हे ब्लॉक करण्यात अपयश आले आहे.
Poco X2 खरेदी करण्याची आज अखेरची संधी
[ad_2]
Source link