[ad_1]
व्होडाफोन-आयडिया कंपनीला ५३ हजार कोटी रुपये भरायचे आहेत. परंतु, कंपनीने आतापर्यंत केवळ ३५०० कोटी रुपये भरले आहे. जर कंपनीने कॉल व डेटाचे दर वाढवले तर युजर्संना १ एप्रिलपासून १ जीबी डेटासाठी ३२ रुपये द्यावे लागतील. तसेच कॉलिंग करण्यासाठी सहा पैसे प्रति मिनिट दर द्यावा लागू शकतो. कंपनीने आता पर्यंत डेटा किंवा कॉलच्या दरात वाढ केली नाही. एअरटेलने काही दिवसांपूर्वी एजीआरची रक्कम भरण्यासाठी १० हजार कोटी रुपये जमा केले आहेत. दूरसंचार कंपन्यांना एजीआरचे ३ टक्के स्पेक्ट्रम फी आणि ८ टक्के लायसन्स फी सरकारकडे भरायची आहेत. एजीआर भरण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिल्याने कंपनीने डेटा आणि कॉलच्या दरात ७ ते ८ टक्के दरवाढ करण्याची मागणी केली आहे. कंपनीला एजीआरची रक्कम भरण्यासाठी १८ वर्षाची वेळ आणि व्याजासह दंडाची रक्कम भरण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी हवा आहे. कोर्टाने आतापर्यंत या मागणीचा विचार केला नाही.
फोटोः थरारक अनुभव देणारे ‘टॉप ५’ रेसिंग गेम्स
रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय!
[ad_2]
Source link