TikTok वर आता पालकांचा ‘कंट्रोल’नवं फीचर!


शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्मवरील टिकटॉक TikTok वर आता पालकांचा कंट्रोल राहणार असणारं नवं फीचर आलं आहे. मुलगा किंवा मुलगी कोणता टिकटॉक करणार आहे. याची माहिती त्यांच्या पालकांना आधीच समजणार आहे. फॅमिली सेफ्टी फीचर असं या फीचरचं नाव आहे. हे फीचर पालकांच्या अकाउंट्सला लिंक करते. त्यामुळे पालकांना या टिकटॉकची माहिती आधीच समजते.


ज्यावेळी लोक टिकटॉकचा वापर करतात. त्यांचा अनुभव गंमतशीर, स्पष्ट आणि सुरक्षित असतो. आम्ही युजर्संना या प्लॅटफॉर्मवर चांगला व सुरक्षित अनुभव देण्यासाठी आहोत. त्यासाठी हे नवं फीचर आणणार आहोत. म्हणूनच फॅमिली सेफ्टी मोड अनाउंसची घोषणा करण्यात आली आहे. या फीचरच्या मदतीने पालक अल्पवयीन मुला-मुलीच्या टिकटॉकरव कंट्रोल करू शकणार आहे. त्यांच्यावर नजर ठेवू शकणार आहे. भारतात अल्पावधीत टिकटॉक खूप प्रसिद्ध झाले आहे. टिकटॉकचे लाखो युजर्स आहेत. यात अल्पवयीन मुला-मुलींचीही मोठी संख्या आहे. या मुला-मुलींचे टिकटॉक सुरक्षित राहावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

Leave a comment