social media : पालकांच्या मोबाइलवर मुलांचा सोशल मीडिया – difficult for parents for away from children’s social media

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लहान मुलांचा मोबाइल आणि सोशल मीडियावरील वाढता वेळ ही अनेक कुटुंबामध्ये चिंतेची बाब आहे. पण ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणात मुले चक्क पालकांच्याच मोबाइलचा वापर सोशल मीडियाच्या वापरासाठी करतात, असे समोर आले आहे. बहुसंख्य मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही. मात्र, ‘मुलांनी मोबाइल जास्त वेळ वापरू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो,’ असे सांगणाऱ्या पालकांची संख्या मोठी असल्याचे दिसत असल्याने मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणे पालकांसाठी अवघड होत असल्याचे सर्वेक्षणामधून समोर येत आहे.

बहुसंख्य पालक आपल्या मोबाइलमध्ये असणाऱ्या सोशल मीडिया साइट्स आणि अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मुलांना स्वत:चा मोबाइल दिलेला नाही, असे म्हणणाऱ्या पालकांची संख्या ११९० (८० टक्के) आहे, तर स्वत:चा मोबाइल असणाऱ्या मुलांची संख्या फक्त २९६ (१९.१टक्के) इतकी आहे. मुले मोबाइलपासून दूर राहावीत यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो, असे म्हणणाऱ्या पालकांची संख्या १२६९ (८५.४ टक्के) आहे, तर मुले मोबाइलपासून दूर राहावीत यासाठी आम्ही प्रयत्न करीत नाही, असे म्हणणाऱ्या पालकांची संख्या २१७ (१४.६ टक्के) इतकी आहे. असे असतानाही मुलांच्या सोशल मीडिया वापरावर आमचे लक्ष आहे, असे म्हणणाऱ्या पालकांची संख्या १३१६ (८८.६ टक्के) इतकी आहे, तर फक्त १७० (११.४ टक्के) पालक मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवत नसल्याचे समोर आले आहे.

याविषयी मत व्यक्त करताना सुचित्रा कमळापूरकर म्हणाल्या, ‘माझा मुलगा १४ वर्षांचा आहे. त्याच्याकडे स्वत:चा मोबाइल नाही आणि त्याने मोबाइल फार वापरू नये यासाठी मी दक्ष असते. त्याच्या बरोबरीचे अनेक मित्र सोशल मीडियावर असल्याने त्यालाही सोशल मीडियावर अकाऊंट असावे, असे वाटत होते. त्यामुळे माझ्या देखरेखीखाली तो सोशल मीडिया वापरतो.’ असेच मत पंकज नाचणकर यांनीही व्यक्त केले. नाचणकर म्हणाले, ‘मुलीच्या सगळ्या मैत्रिणी सोशल मीडियावर आहेत. तिला मी नकार दिल्याने आमच्यात वाद होत होते. मी वापरत नाही, तर तुम्हीही वापरायचे नाही, असे तिचे म्हणणे होते. ही गोष्ट शक्य नव्हती. अखेर तडजोड म्हणून आम्ही तिला आमच्या फोनवरून सोशल मीडिया वापरण्याची मुभा दिली आहे.’

या सर्वेक्षणाचे विश्लेषण करताना समुपदेशक सीमा जठार म्हणाल्या, ‘सध्याच्या युगात आपण सोशल मीडियापासून मुलांना दूर ठेवू शकत नाही, ही वस्तुस्थिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. दहावीपर्यंत मोबाइल देणार नाही हे म्हणणेही आता पालकांना अवघड होत जात आहे. ‘पीअर प्रेशर’मुळे किंवा काही वेळा सुरक्षेची गरज म्हणून मुलांना मोबाइल द्यावा लागतो. मोबाइल कोणता द्यावा, किती महागातला द्यावा यावर पालकांनी नियंत्रण ठेवले पाहिजे. ऐपत आहे म्हणून महागडा मोबाइल किंवा महागातला आयपॅड देण्याची गरज नाही.’

‘मुले सोशल मीडिया जबाबदारीने हाताळतील यासाठी पालकांनी सजगपणे लक्ष द्यायला हवे. तसेच, सध्या एकमेकांशी मैत्री होण्यात फोन किती महागातला आहे, कोणत्या ब्रँडचा आहे या गोष्टी महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यावरून मुलांमध्ये आपसात भेदभाव केला जात आहे. ही गोष्ट समाजाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना सोशल मीडिया जबाबदारी वापरण्यासह कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे शिकवले पाहिजे,’ असेही जठार यांनी स्पष्ट केले.

सर्वेक्षणातील निष्कर्ष

स्वत:चा मोबाइल असणारी मुले : २९६ (१९.१)

स्वत:चा मोबाइल नसणारी मुले : ११९० (८०.१)


पालकांना विचारण्यात आलेले प्रश्न

मोबाइलपासून मुले दूर राहावीत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करता का?

नाही : २१७ (१४.६)

होय : १२६९ (८५.४)

मुले सोशल मीडियाचा काय आणि कसा वापर करता, यावर लक्ष ठेवता का?

नाही : १७० (११.४ टक्के)

होय : १३१६ (८८.६ टक्के)

स्मार्टफोनसाठी पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त अस्वस्थ

Poco X2 खरेदी करण्याची आज अखेरची संधी

‘या’ देशात फेक WhatsApp ला लोकांची पसंती



[ad_2]

Source link

Leave a comment