पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस एकोणिसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सराव करूया.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय देऊन सूचनाफलक तयार करण्यास सांगणे त्याकरिता खालील
गोष्टी लक्षात ठेवाव्यास सांगणे.
1. सूचना कमीत कमी शब्दात असावी.
2. सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात, नेमके व विषयानुसार असावे.
3. सुचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावे.
4. सूचनेचे लेखन शुद्ध असावे.
+ कल्पक होऊया.
कृती- १ 1. विद्यार्थ्यांना एखादा विषय देऊन संबंधित बातम्यांचे संकलन करून वहीत चिकटवण्यात सांगावे. उदाहरणार्थ -क्रीडा.
2. तुमच्या शाळेत पार पडलेल्या शिक्षक दिनाबद्दल बातमी तयार करा.
कृती-२
1. तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
2. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा पाणीबचतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा त्यातील तुम्हाला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून
शाळेच्या परिसरात लावा.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 19
चला समजून घेऊयाः टूथपेस्ट, अपमार्जक, सिमेंट संदर्भ- इयत्ता 7 वी प्रकरण 15 पदार्थ आपल्या वापरातील
अध्ययन निष्पत्ती : शास्त्रीय संकल्पनांचे दैनंदिन जीवनात उपयोजन करतात, प्रदूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी योग्य त्या पद्धती सुचवणे, साबण निर्मिती व उपयोग, मिश्रणातील घटक वेगळे करणे इत्यादी.
4. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग का होत नाही?
5. अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात?
विषय – इतिहास ना.शास्त्र
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – भूगोल
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.