पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस सव्वीसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
थोडं समजून घेऊ
● तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात.
त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू व कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात. त्रिकोणाचे प्रकार – बाजूंवरून
ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात.
ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात.
ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात, त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाचे प्रकार – कोनांवरून
ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात, त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात.
ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात.
ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो, त्या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाचे गुणधर्म
त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.
त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते.
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – इतिहास ना.शास्त्र
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – भूगोल
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.