पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या कृती-1
१) शिक्षकांनी पुढील वाक्य फलकावर लिहून विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावेत.
1. काका आला.
2. मीरा आली.
3. रिया आली.
4. नेतन आला.
२) वाचनात अडचणी येत असतील तर शिक्षकांनी त्याची नोंद घ्यावी.
३) पुन्हा पुन्हा वाचन सराव द्यावा.
४) शिक्षकांनी सरावासाठी दिलेल्या वाचनपाठाचे वाचन करायला सांगावे. ५)कठीण शब्द असल्यास मदत करावी.
६) वाचनपाठाचे वाचन ही संकल्पना रुजली की नाही ते पहावी. (अर्थपूर्ण वाचन झाले का? याचा पडताळा शिक्षकांनी आपल्या कल्पकतेने घ्यायचा आहे.)
त्यांनी ऐकलेली गोष्ट सांगण्यास सांगावी. शिक्षकांनी एखादी छोटी गोष्ट सांगावी. गोष्टीतील आशयावर लहान लहान प्रश्न विचारावे. उदा. किती पत्र आहेत? गोष्टीचा आशय थोडक्यात सांगा.
कृती- २ मुलांच्या भावविश्वातील व आवडीच्या विषयावरील गोष्टींबद्दल चर्चा करावी. व त्याबाबतची
माहिती जाणून घ्यावी.
त्यांनी एक गोष्ट सांगण्यास सांगावी. शिक्षकांनी एखादी छोटी गोष्ट सांगावी. गोष्टीतील आशयावर लहान लहान प्रश्न विचारावे. उदा. किती पत्र आहेत? गोष्टीचा आशय
थोडक्यात सांगा.
★ सक्षम होऊ या
कृती- १ फलकावर लिहिलेला वाचन पाठ विद्यार्थ्याना वाचनासाठी म्हणून द्यावा.
कठीण ठिकाणी शिक्षकांनी मदत करावी.
वाचन पाठ १
काका घरी आला.
व पुढे सर्व प्रकरणी पुस्तके वापरावी.
5. यामधून मुलांना लेखी मजकुराची जाणीव करून द्यावी. भाषेचे बारकावे समजून
सांगावे.
सराव करू या
कृती-१ वाक्य वाचू. पाठ समजून घेऊ. रमा काकू कामावरान आली. तिला बरे वाटत नाही. तापही आलाय. काकाने तिला औषध दिले. सुरेशने दूधभात दिला.
कृती-२ शिक्षकांनी वाचनासाठी नवीन वाचनपाठ द्यावा आणि वाचन करण्यास सांगावे. कठीण टिकाणी विद्याथ्र्यांना मदत करावी. ( भाषा साहित्य पेटीतील वाचन पाठ/ पाठ्यपुस्तकातील वाचनपाठ / शिक्षकांनी स्वतः वाचनपाठ तयार करून )
कृती-३ मुखपृष्ठ व मलपृष्ठ ओळख, पृष्ठ उलटणे, चित्र पाहणे, डावीकडून उजवीकडे वाचायचे असते
इत्यादींचा मुलांना सरावाची संधी द्यावी.
कल्पक होऊ या
कृती-१ विद्यार्थ्यांना ३/४ वाक्याचे वाचनपाठ तयार करायला सांगा. काही शब्द द्यावेत व ते
वापरून वाचनपाठ तयार करण्यास सांगावे
कृती-२ विद्यार्थ्यांना ५ / ६ वाक्याचे वाचनपाठ तयार करायला सांगा. एखादे वाक्य द्यावे व ते वापरून वाचनपाठ तयार करण्यास सांगावे.
कृती: वाचन कोपल्यातील/ ग्रंथालयातील गोष्टीची पुस्तके शोधून यादी तयार करण्यास सांगा.