science technology News: ट्विटरवरील ‘मागणी’ला पोलिसांचा पुणेरी ‘चिमटा’ – punekar demand on twitter and pune police’s funny replies to them

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांच्या विविध प्रश्नांची कधी काटेकोर, कधी उपहासात्मक तर कधी विनोदी पद्धतीने उत्तरे देण्यासाठी पुणे पोलिसांचे ट्विटर हँडल चांगलेच प्रसिद्ध आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात पुणे पोलिसांकडून ट्विटरवर केली जाणारी जनजागृती पाहून एका तरुणाने थेट ट्विटद्वारेच लग्नाची मागणी घातली आहे.

‘नमस्कार, जो कोणी हे ट्विटर हँडल हाताळत आहे … ती वीस वर्षांची महिला असेल, तर कृपया माझ्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारा. आयुष्याच्या उत्तरार्धात अंतराळ प्रवासाची योजना करीत आहे,’ असे ट्विट करत लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. त्यावर पुणे पोलिसांनीही ट्विट करीत चांगलेच प्रत्युत्तर संबंधित तरुणाला दिले आहे. ‘ही मागणी फेटाळणे काहीसे कठीण आहे; पण या टीममध्ये अनेक महिला आणि पुरुषही काम करतात. बहुतेक जण खाकी वर्दीतले…जे फक्त पुण्यालाच फेऱ्या मारणे पसंत करतात..फक्त पुण्याला,’ असे उत्तर देऊन संबंधित तरुणाने घातलेल्या लग्नाच्या मागणीच्या गुगलीवर पुणे पोलिसांनी जोरदार षटकार मारला आहे.

वाचाः
जिओचा कॉम्बो प्लान, १०००GB डेटा, फ्री कॉलिंग

सध्या लॉकडाउनच्या काळातही पुणे पोलिस आपल्या ट्विटर हँडलवरून लोकांना घरी राहण्याच्या सूचना देत आहेत आणि जे लोक सूचना ऐकत नाहीत, त्यांची चांगलीच फिरकी घेत आहेत. ‘अगर मैं बाहर निकला तो…???’ असा प्रश्न एका तरुणाने ट्विट केला होता. त्यावर उत्तर देताना पोलिसांनी त्याला चांगले सुनावले. ‘अगर हम आपको अंदर कर दे तो…, अगर हम बिना बात के किसी को अंदर कर दे तो क्या सही होगा..? तो फिर बिना बात के बाहर जाना कैसे सही है,’ असे प्रत्युत्तर पुणे पोलिसांनी दिले आहे.

वाचाः
Lenovo A7 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी घेतलेल्या फिरकीला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याचे पुणे पोलिसांनी ठरवले आहे. त्यामुळे या विषयाची चांगलीच चर्चा रंगत आहे.

वाचाः
मस्त! करोना व्हायरसची अधिकृत माहिती येथे मिळेल



[ad_2]

Source link

Leave a comment