शिष्यवृत्ती परीक्षा 2022 इयत्ता पाचवी व आठवी प्रवेश पत्र डाउनलोड करणे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 इयत्ता पाचवी व आठवी प्रवेश पत्र डाउनलोड करणे.

20 जुलै 2022  रोजी घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे प्रवेश पत्र कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे याविषयी सविस्तर माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे.

स्टेप 1

सर्वप्रथम आपण खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा

https://www.mscepuppss.in/

स्टेप 2

यानंतर आपल्यासमोर आलेल्या स्क्रीनवर 2022 यावर क्लिक करा.

स्टेप 3

आपल्यासमोर डाव्या बाजूला शाळा लॉगिन हा शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 4

शाळा लॉगिन वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर यूजर आयडी व पासवर्ड टाकण्याचा ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपल्या शाळेचा यु-डायस व पासवर्ड एंटर करावा व लॉगिन करा.

स्टेप 5

लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड या डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला इयत्ता पाचवी आठवी हॉल तिकीट काढण्याची लिंक दिसेल आपल्याला ज्याय त्याचे हॉल तिकीट प्रवेश पत्र काढायचे असेल त्यावर क्लिक करावे.

स्टेप 6

सर्व हॉल तिकीट प्रवेश पत्र एकाच पीडीएफ मध्ये देण्यात आल्यामुळे सर्व हॉल तिकीटची एकच पीडीएफ आपल्या समोर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.

यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या प्रिंट हॉल तिकीट या बटनवर क्लिक करा. व आपल्या कम्प्युटरमध्ये हे हॉल तिकीट डाउनलोड किंवा प्रिंट करण्याचा ऑप्शन दिसेल.

अशा पद्धतीने आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आठवीचे हॉल तिकीट सहजपणे डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता.

निश्चितच ही पोस्ट आपल्याला फायदेशीर ठरले असेल तर आपल्या इतर ग्रुप वर या पोस्टची लिंक अवश्य शेअर करा.