[ad_1]
Galaxy S7 आणि त्यानंतर स्मार्टफोन डिझाईनमध्ये सॅमसंगने रिमूव्हेबल बॅटरी आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देणे बंद केले होते. रिमूव्हेबल बॅटरीचे फोन बंद केले होते कारण बॅटरी जुनी झाल्यानंतर बॅटरीला नवीन सहज पणे खरेदी करता येऊ शकत होते. नवीन बॅटरी टाकली की नवीन फोनला जितकी बॅटरी पॉवर मिळायची तितकी या जुन्या फोनमध्ये मिळत असायची. तसेच अनेक युजर्सं एक्स्ट्रा बॅटरी युनिट्स आपल्याकडे ठेवत असत. ज्यांना अडचणींच्या काळात गरज पडल्यास तिचा वापर करता येऊ शकत होता. तसेच थर्ड पार्टी कंपन्या फोन्सच्या जास्त कॅपिसिटी असलेली बॅटरी बनवत असत. त्यामुळे फोनला बॅटरी बॅकअप चांगला मिळत होता.
फ्लॅगशीपमध्ये बदल नाही
सध्या 4000mAh ते 5000mAh कॅपिसिटी असलेली बॅटरी डिव्हाईस मिळते. तसेच फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. त्यामुळे फोनला दिवसभराचा बॅकअप मिळतो. तसेच वेगाने फोन चार्ज केला जाऊ शकतो. असे असतानाही एक कंपनी रिमूव्हेबल बॅटरी डिझाईनवर परत येत आहे. ती कंपनी म्हणजे सॅमसंग आहे. कंपनीने फ्लॅगशीपमध्ये रिमूव्हेबल बॅटरी देणार नाही तर एका लिक झालेल्या रिपोर्टनुसार, सॅमसंग कंपनी काही मिड रेंज डिव्हाईसमध्ये रिमूव्हेबल डिझाईन देण्याची शक्यता आहे.
या फोनमध्ये नवीन डिझाईन
सॅमसंगने नवीन डिझाइन मध्ये रिमूव्हेबल बॅटरी देण्याची शक्यता आहे. याचा मॉडल नंबर SM-A013F समोर आला आहे. या स्मार्टफोनचे नाव Galaxy A01e असू शकते, अशी माहिती समोर आली आहे. या बजेटमधील फोनमध्ये याचा वापर करण्यात येईल. सॅमसंगने सर्वात शेवटी आपल्या मोबाइलमधील रिमूव्हेबल बॅटरी देणे बंद केले होते. बजेट डिव्हाईस रिमूव्हेबल बॅटरी सोबत दोन वर्षापर्यंत बॅटरी मिळत होती. आता पुन्हा एकदा हा ट्रेंड सुरु होण्याची शक्यता आहे.
वाचाः कॅमेरा, नॉच, फिंगरप्रिंटः स्वस्त फोन खरेदी करताना ग्राहकांची कशाला पसंती
[ad_2]
Source link