[ad_1]
Redmi Note 9 Pro ची खास वैशिष्ट्ये
रेडमी नोट ९ प्रोच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला अॅमेझॉन इंडिया, एमआय होम स्टोर्स, एमआय डॉट कॉम वरून खरेदी करता येऊ शकते. हा स्मार्टफोन ऑरोरा ब्लू, ग्लेसियर व्हाइट आमि इंटरस्टेलर ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे.
१० हजार ₹ बजेटमधील खास लेटेस्ट स्मार्टफोन
रेडमी नोट ९ प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. रेडमी नोट प्रो मॅक्सप्रमाणे नोट ९ प्रोमध्येही ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या फास्ट चार्जिंगसाठी १८ वॅटचा चार्जर दिला आहे.
‘या’ अॅप्सच्या मदतीनं ‘करो’ना वर्क फ्रॉम होम
[ad_2]
Source link