realme c3 price in india : रियलमी C3 भारतात लाँच, किंमत ६,९९९₹ – realme c3 with 5,000 mah battery launched in india for ₹6,999. check specs

[ad_1]

नवी दिल्लीः रियलमी सी ३ (Realme C3) आज भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये लेटेस्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळणार आहे. याआधी कंपनीने सी१ आणि सी२ बाजारात लाँच केले होते. हे दोन्ही फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. आज लाँच झालेला रियलमी सी३ फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करता येऊ शकणार आहे.

रियलमी सी३ भारतात आज दुपारी साडे बारा वाजता लाँच करण्यात आला आहे. या लाँचचा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून लाइव्ह दिसत होता. हा फोन दोन पर्यायात लाँच करण्यात आला आहे. ज्यात ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा समावेश आहे. कंपनीने ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये, तर ४ जीबी रॅम फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. रियलमी ३ या फोनच्या खरेदीवर जिओकडून ७ हजार ५५० रुपयांचा फायदा मिळणार आहे. तर फ्लिपकार्ट व कंपनीची अधिकृत साइट आणि ऑफलाइन स्टोरवर या फोनची विक्री १४ फेब्रुवारीपासून होणार आहे.

Realme C3 मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले असणार आहे. हे वॉटरड्रॉप स्टाइल नॉच सह आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन -टू-बॉडी रेशियो ८९:८ टक्के आहे. सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात येणार आहे. Realme C2 मध्ये Mediatek Helio G70 चिपसेट दिला जाणार आहे. ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. रियलमीने या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि २ मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. युजर्सना फोनमध्ये फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. या फोनमध्ये युजर्स एचडी व्हिडिओ रिकॉर्डिंग करता येऊ शकणार आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे.

Redmi : शाओमीच्या नव्या रेडमी फोनचा टीझर पाहिला?

‘करोना’चा मोबाइल-कॉम्प्युटर आयातीला फटका

Flipkart Apple Days : ‘आयफोन’वर बंपर सूट



[ad_2]

Source link

Leave a comment