Parzania : Fake Alert: parzania चित्रपटातील फोटो वापरून RSS चे लोक दहशतवादी असल्याचा खोटा दावा – fake alert: a still from parzania movie shared with captions to target rss

[ad_1]

दावा

सोशल मीडिया साइट ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर एका फोटोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या विरोधात कॅप्शन लिहून शेअर केले जात आहे. या फोटोत काही भगवा रंगाचे कपडे घातलेले लोक आणि हातात तलवार घेतलेला जमाव दिसत असून ते एका व्यक्तीवर आपल्या बळाचा प्रयोग करताना दिसत आहेत.

या फोटोला कॅप्शन लिहिले की, RSS चे लोक दहशतवादी आहेत. आता भारत सरकारही त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. पाहा, व्हॉट्सअॅपवर आम्हाला मिळालेल्या एका मेसेजचा स्क्रीनशॉट.


या फोटो जवळपास याच कॅप्शनसह Khaled Beydoun नावाच्या ट्विटर युजरने शेअर केले आहे. परंतु, आता त्याने हे ट्विट डिलिट केले आहे.

खरं काय आहे ?

हा फोटो एका चित्रपटातील घेतलेला स्क्रीनग्रॅब आहे. २००२ मधील गुजरात दंगलीवर बनलेल्या Parzania या चित्रपटातील हा स्क्रीनग्रॅब आहे. हा चित्रपट २००५ मध्ये बनवला होता.

कशी केली पडताळणी ?

या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला
‘The Indian Express‘ च्या २९ जून २०१६ रोजी छापलेली एका फोटो स्टोरीची लिंक मिळाली. या फोटो स्टोरीचे शीर्षक ‘Before Shorgul, nine Bollywood films that portrayed Hindu-Muslim tension’ असे होते. आणि यात हिंदू-मुस्लिमांचा संघर्ष दाखवणाऱ्या चित्रपटाबद्दल सांगण्यात आले होते.

नऊ नंबरवर हाच स्क्रीनग्रॅब आहे. जो आता आरएसएस विरुद्ध कॅप्शनसह सोशलवर शेअर केला जात आहे. फोटोसोबत कॅप्शन लिहिले होते. ‘Parzania (2007): २००२ गुजरात दंगलीवर बनवण्यात आलेला चित्रपट. यात प्रमुख भूमिका नसीरुद्दीन शाह आणि सारीका यांनी साकारली होती. हा चित्रपट २८ फेब्रुवारी २००२ ला गुलबर्ग सोसायटी मध्ये झालेल्या हत्याकांडा दरम्यान एक १० वर्षाचा पारशी मुलगा बेपत्ता झाला होता. त्याच्या खऱ्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटात मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याला शोधण्यासाठी कुटुंबाला किती कष्ट सहन करावे लागले होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

सर्च करताना आम्हाला हेही दिसले की, हा फोटो अनेक पाकिस्तानी ब्लॉग्स आणि वेबसाईटवर आरएसएस किंवा हिंदुच्या विरोधात लिहिताना या फोटोचा वापर करण्यात आला आहे. परंतु, हा फोटो चित्रपटातील आहे, असे कुठेही सांगण्यात आले नाही. उदाहरणासाठी
येथे आणि
येथे पाहा.

निष्कर्ष

२००५ साली गुजरात दंगलीवर बनवलेला Parzania चित्रपटातील घेतलेला स्क्रीनग्रॅब आता सोशल मीडियावर आरएसएस विरोधात कॅप्शन लिहून शेअर करण्यात येत आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment