oppo fantastic days sale : ओप्पो सेलः स्मार्टफोनवर १३००० ₹ डिस्काउंट – oppo fantastic days sale: upto rs 13000 discount on oppo f11 pro smartphone

[ad_1]

नवी दिल्लीः ओप्पोचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. ओप्पोने २४ फेब्रुवारीपासून ओप्पो फॅन्टॅस्टिक डेज (Oppo Fantastic Days) सुरू केला आहे. ओप्पोचा हा सेल २७ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ओप्पोच्या फोनवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये ओप्पो रेनो २, (Oppo Reno 2), आणि ओप्पो एफ११ प्रो (Oppo F11 Pro) या दोन स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे.

Oppo F11 Pro वर १३ हजार डिस्काउंट

ओप्पोचा Oppo F11 Pro फोनवर तब्बल १३ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन लाँच केला होता. त्यावेळी या फोनची किंमत २८ हजार ९९० रुपये होती. परंतु, आता हा फोन या सेलमध्ये १५ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या सीरीजमध्ये कंपनीने ओप्पो एफ११ प्रो आणि ओप्पो एफ११ लाँच केले होते. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये १०८०X२३४० पिक्सलचा रिझॉल्यूशन दिला आहे. ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी७० चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी रियरमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच १६ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Oppo Reno 2 वर ७००० रुपये डिस्काउंट

ओप्पो रेनो २ या फोनवर ७००० रुपये डिस्काउंट दिला जात आहे. लाँच वेळी या फोनची किंमत २८ हजार ९९० रुपये होती. परंतु, या सेलमध्ये हा फोन आता केवळ २१ हजार ९९० रुपयांत मिळत आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, स्मार्टफोनमध्ये हिडन फिंगरप्रिंट अनलॉक ३.० देण्यात आली आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७३० जी ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओशन ब्लू आणि ल्यूमिनस ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध आहे.

BSNL ऑफरः ९९९९ रुपयांचे गुगल प्रोडक्ट १९९ रुपयांत

६ कॅमेऱ्याचा नोकियाचा फोन १५००० ₹ स्वस्त

‘गेमिंग ऑन डिमांड’: ‘हे’ गेम्स कधीही-कुठंही खेळा

जिओचे कमी किंमतीतील दोन नवे प्लान लाँच



[ad_2]

Source link

Leave a comment