[ad_1]
नोकिया फोनची किंमत
एचएमडी ग्लोबलने आतापर्यंत नोकिया १२५ आणि नोकिया १५० फीचर फोनच्या किंमतीची घोषणा केली नाही. परंतु, या दोन्ही फोनच्या किंमती बजेटमधील असतील असा अंदाज आहे.
नोकिया १२५ ची वैशिष्ट्ये
नोकिया १२५ मध्ये २.४ इंचाचा क्यूव्हीजीए कलरचा डिस्प्ले आहे. यात टायपिंग आणि मोठ्या साईजचे बटन देण्यात आले आहे. युजर्संना या फोनमध्ये ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेजचा सपोर्ट दिला आहे. तसेच या फोनमध्ये वायरलेस रेडिओसह एलईडी फ्लॅश लाइट देण्यात आली आहे. या फोनमध्ये १०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनची बॅटरी १९.४ तास बॅकअप देत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. फोनमध्ये ड्युअल स्लॉट सपोर्ट दिला आहे.
वाचाःशाओमीने दीड महिन्यात स्मार्टफोनच्या किंमती पुन्हा वाढवल्या
नोकिया १५० ची वैशिष्ट्ये
नोकिया १५० फीचर फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फीचर फोनमध्ये नोकिया १२५ प्रमाणे की-पॅड दिला आहे. फोनमध्ये ४ एमबी रॅम सोबत ४ एमबी स्टोरेज दिला आहे. हा फीचर फोन ३० प्लस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कंपनीने या फोनमध्ये १०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. युजर्संना या फोनमध्ये एमपी ३ प्लेअर आणि वायरलेस रेडियो चा सपोर्ट मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये व्हीजीए कॅमेरा सुद्धा दिला आहे.
वाचाः लॉकडाऊनः जिओचा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान लाँच
वाचाः लॉकडाऊनमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?
वाचाः ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी
[ad_2]
Source link