इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 21

इ 7 वी   सेतू  अभ्यास दिवस  21  

विषय  – गणित 


विद्यार्थी मित्रानो तुम्हाला सर्वाना आय. पी. एल. बघायला नक्की आवडत असेल म्हणूनच आपण आय.पी.एल. वर आधारित एका स्तंभालेखाचे निरीक्षण करणार आहोत. आय. पी. एल. मध्ये मुंबई इन्डियन्स ने पॉवर प्ले मध्ये बनवलेल्या सहा सामन्यातील धावांचा तपशील खालील स्तंभालेखामध्ये दर्शविलेला आहे.

आता आपण स्तंभालेख समजावून घेऊयात.

  1. आडव्या अक्षावर ( X अक्षावर ) समान अंतरावर सहा सामने क्रमाने दाखवले आहेत.
  2. उभ्या अक्षावर ( Y अक्षावर ) समान अंतरावर प्रत्येक सामन्यातील पॉवर प्ले मधील धावा दाखवल्या आहेत.
  3. प्रत्येक सामन्यात पॉवर प्ले मध्ये किती धावा केल्या आहेत ते आपल्याला स्तंभाच्या उंचीवरून समजेल. उदाहरणार्थ पहिल्या स्तंभाची उंची 40 आहे म्हणजेच पहिल्या सामन्यात मुंबई इंडिअन्स ने पॉवर प्ले मध्ये 40 धावा केल्या आहेत, याप्रमाणे प्रत्येक स्तंभाच्या उंचीवरून इतर सामन्यातील धावा तुम्ही सांगू शकता .

चला सराव करूया

आता वरील स्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. उभ्या रेषेवर ( Y अक्षावर ) कोणती माहिती दर्शवली आहे ?
  2. आडव्या रेषेवर ( X अक्षावर ) कोणती माहिती दर्शवली आहे ?
  3. सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती ?
  4. सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती ?
  5. कोणत्या दोन सामन्यांमध्ये समान धावा केल्या आहेत व किती ?
  6. 60 धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत ?
  7. सर्व सहा सामन्यांमध्ये पॉवर प्ले मध्ये एकूण किती धावा केल्या आहेत ?
  8. सर्वाधिक धावा व सर्वात कमी धावा यामध्ये किती धावांचा फरक आहे ?

वरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा व तुमच्या शिक्षकांकडून किंवा पालकाकडून तपासून घ्या.

  1. सर्वात कमी तापमान कोणत्या शहराचे आहे व ते किती आहे?
  2. कोणत्या 2 शहराची तापमाने समान आहेत ?
  3. चेन्नई या शहराचे तापमान किती आहे ?
  4. सर्वाधिक तापमान व सर्वात कमी तापमान यातील फरक किती आहे ?

Leave a comment