इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 35
विषय – गणित


संबोध कोपरा –
व्यवहारात दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करण्यास शिकूया.
1) एका पेन्सिलची किंमत साडेतीन रुपये व वहीची किंमत साडेबारा रुपये आहे. तर पेन्सिल व वही यांची एकूण किंमत किती रुपये होईल ?

2) सुहासने दुकानातून पावणे एकोणचाळीस रुपयाची साखर खरेदी करून दुकानदाराला 50 रुपये दिले. तर दुकानदार सुहासला किती रुपये परत देईल?

सराव कोपरा
प्रश्न 1) खालील बेरजा कर
1) 49.7 मी + 837.54 मी
2) 6185.75 रुपये + 481.25 रुपये
3) 9.56+ 57.96
प्रश्न 2) खालील वजाबाकी कर.
1) 206.35 – 168.22
2) 81.23 – 49.95
.3) 32.60 मी29.75 मी
प्रश्न 1) दिपालीने 525.50 रुपयांची औषधे खरेदी केली आणि 350 रुपयांची पर्स घेतली तर तिने एकूण किती रुपये खर्च केले ?
प्रश्न 2) गेल्या वर्षी किरणची उंची 1.26 मीटर होती. ह्या वर्षी तिची उंची 1.33 मीटर झाली. तर एका वर्षात तिची उंची किती सेमी वाढली?