इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 22

इ 6 वी  सेतू  अभ्यास दिवस  22  

विषय  – गणित 

-थोडे आठवूया

उपघटक दशांश अपूर्णांकांचे वाचन व लेखन

आपल्याला अपूर्णांकातील अंश व छेद ओळखता येतात.

एखाद्या वस्तूचे जितके समान भाग केले जातात ते अपूर्णांक लिहिताना आपण रेषेखाली लिहितो त्यांना आपण ‘छेद’ म्हणतो.

आणि केलेल्या समान भागांपैकी जितके भाग घेतले जातात त्यास अंश म्हणतो.

एक भाकरी दोघांत समान वाटल्यास प्रत्येकाला 2 पैकी 1 भाग मिळेल व तो ½,असा लिहितात. जर भाकरीचे 4 समान भाग करून दोघांत वाटल्यास प्रत्येकाला 2 भाग मिळतात म्हणजे अर्धीच भाकरी मिळते व 2/4 असे लिहितात. तसेच जर भाकरीचे 6 समान भाग करून दोघांत वाटल्यास प्रत्येकाला 3 भाग मिळतात म्हणजे अर्धीच भाकरी मिळते व ते 3/6असे लिहितात. यावरून अर्धा 1/2 , 2/4 3/6 अशा वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. या तीनही अपूर्णांकांची किंमत समान आहे.

अशाप्रकारे समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना ‘सममूल्य अपूर्णांक म्हणतात.


Leave a comment