इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 21
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास
क्षेत्राचे नाव – संख्याज्ञान
घटकाचे नाव संख्यांचा चढता व उतरता क्रम
उपघटक- दोन अंकी संख्या लिहिताना आणि तुलना करताना स्थानिक किमतीचा उपयोग करतात.

मग सर्वात लहान संख्या कोणती असेल ?
२६ मध्ये १० रुपयाच्या दोन नोटा
जिच्यामध्ये दहाच्या नोटा म्हणजे दशकचा अंक लहान असेल ती संख्या लहान.
१८,४३, २६ मध्ये १८ चा दशक अंक लहान म्हणून १८ लहान.
राहिलेल्या ४३ व २६ मध्ये २६ मधील दशक अंक लहान म्हणून २६ ही संख्या ४३ पेक्षा लहान व शेवटी राहिलेली ४३ सर्वात मोठी संख्या.
ते असे लिहिता येईल १८ < २६ ४३
आता सर्वात मोठा कोण ? ज्याच्याकडे १० रुपयाच्या नोटा जास्त म्हणजे दशक अंक मोठा ती संख्या. ४३ मध्ये दशक मोठा म्हणून ४३ मोठी ती लिहून घे, त्याला गोल कर. राहिलेले १८ व २६ मध्ये २६ मधील दशक अंक मोठा म्हणून ती संख्या १८ पेक्षा मोठी ती लिहून त्याला गोल कर. राहिलेला १८ शेवटी लिही.
म्हणजेच ४३ >२६ > १८
चढता क्रम = १८, २६, ४३
उतरता क्रम = ४३, २६, १८ असे लिहितात.

