इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 26

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 26

विषय  – मराठी 


प्रकट व मुकवाचन 

खालील उताऱ्याचे प्रकट व मुकवाचन  करा

उतारा क्रमांक एक 

पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील; पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत. त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मानपदके देऊन गौरवले जाते.

‘परमवीर चक्र’ हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो. ‘परमवीर चक्र’ हा फार दुर्लभ सन्मान आहे. आतापर्यंत फक्त एकवीस वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यातील चौदा वीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आला आहे.

उतारा क्रमांक दोन 

परमवीर चक्र’ पदक दिसायला अगदी साधे आहे. कांस्य धातूपासून बनवलेले, छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे. गडद जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्या मधे दोन कमलपुष्पे आहेत. ‘परमवीर चक्र’ पदकाचे डिझाइन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन; परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला, परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment