इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 20
विषय – मराठी
उभयान्वयी अव्यय
खालील वाक्यांचे व्यवस्थित निरीक्षण करा
सुशांत आणि सीमा रोज व्यायाम करतात.
यास्मीनने झाडांना पाणी दिले आणि फाटकाला कुलूप लावले.
हत्ती किंवा उंट यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र काढा.
त्याने पेन व पेन्सिल कंम्पासपेटीमध्ये ठेवले.
खालील परिच्छेद वाचा

उभय म्हणजे दोन आणि अन्वय’ या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा संबंध जोडणे, हे उभयान्वयी अव्ययाचे मुख्य कार्य आहे.
खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये ओळख आणि ती कोणत्या शब्दांना जोडतात ते लिहा.
१. त्याचे घर आणि शाळा समोरासमोर आहे.
२. मी जेवतो व खेळायला जातो.
३. ललित झाडावर चढून आंबे काढ किंवा खाली पडलेले वेचून टोपलीत ठेव.
४. आपण देशासाठी वेळ देणार आहोत की नाही ?
५. घराबाहेर जाताना सर्व दिवे आणि नळ आठवणीने बंद करावेत.
६. बाबा नेहमीच बचत करतात; पण स्वतःसाठी खर्च करत नाहीत.