इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 20
विषय – मराठी
विशेषण
खालील बाहुलीचे व्यवस्थित निरीक्षण करा

बाहुली कशी आहे त्याचे वर्णन लिहा
तुम्ही जे बाहुलीचे वर्णन केले बाहुली हे नाम असून अशाच नामाबद्दल माहिती देणा-या शब्दांना विशेषण म्हणतात.
पुढील वाक्यातील विशेषण शोधा. त्यासाठी अगोदर नाम शोधा. मग त्याचे वर्णन करणारी विशेषण सहज सापडतील, ते खालील चौकटीत लिहा.
1) “ही मुलगी हुशार आहे बरं का !”
2) नदीकाठी मऊ माती होती, काळेभोर खडक होते आणि दाट झाडी होती, पाणी खोल नव्हते; पण स्वच्छ होते.

पुढे दिलेल्या विशेषणाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.
1) इवलासा
“अगोबाईs ! –……………बाहुली आणि तिचा……….. – पाळणा ! आणि दागिनेसुद्धा ………! किती गोड!! “
पुढील चौकटीत अनेक विशेषणे आहेत आणि त्यातच त्यांच्या विरुद्ध अर्थाची विशेषणे आहेत. त्यांच्या जास्तीत जास्त जोड्या शोधून लिहा.
