इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 44
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास

जाणून घेऊ या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखाद्या घटनेबाबतच्या कल्पनेबाबत विद्यार्थी किती व कशाप्रकारे विचार करतात/कल्पना करतात व लिहितात हे जाणण्यासाठी
| पुढील कृती द्यावी.
शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रसंगी विद्यार्थ्यांना काय वाटेल ते 2 ते 3 वाक्यांत लिहिण्यास सांगतात.
1) आजारी व्यक्तीला पाहून
2) बाजारात फिरताना
3) क्रिकेट खेळताना चेंडू हरवला तर
4) हिरवागार निसर्ग पाहून
5) गोष्टींची पुस्तके दिसली तर
(विद्यार्थ्यांनी लिहिलेली वाक्ये पाहून एखाद्या घटनेबाबत विद्यार्थ्यांना कशाप्रकारे कल्पना करता येते व लिहिता येते हे शिक्षकांनी जाणून घ्यावे.)
सक्षम बनू या
शिक्षक विद्यार्थ्यांना विद्यार्थी एखाद्या घटनेबाबत कल्पना करण्यासाठी व लिहिण्यासाठी पुढील मुद्दे महत्त्वाचे सांगतील. अ)स्वतः त्या घटनेत तुम्ही सहभागी आहात ही कल्पना करून मनात विचार आणणे / करणे.
(ब) ती घटना स्वतः अनुभवत आहात वा अनुभवली आहे हा विचार मनात आणणे.
क) ती घटना डोळ्यासमोर आणणे.
ड) त्या घटनेतील पात्राशी जुळवून घेत त्या पात्रातील नायक आपण स्वतः आहोत हा विचार करून कल्पना करणे.
ई) घटना आपल्या परिसरातच घडते हा विचार करणे.
शिक्षकांनी वरीलप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. पुढील विषयांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना कल्पना सांगावी. शिक्षक स्वतः “मी विद्यार्थी झालो” तर या विषयावर कल्पनाविस्तार करून सांगतील.
एका एका गटाला विषय देऊन चर्चा घडवून आणण्यास मदत करतील व गटातील एकाला सादरीकरण करण्याची संधी देतील.
सराव करू या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील विषयावर कल्पना करण्यास सांगावी व ती लिहिण्यास सांगावी.
कोरोना संपल्यावर शाळा सुरू झाली तर काय काय होईल हे लिही
कल्पक होऊ या
अचानक एखादी रोगाची साथ आली तर ? याविषयी लिही.
अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांची मते जाणून घेऊन काय करावे लागेल याविषयी लिही.