इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 42

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 42

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

शिक्षकांनी इयत्ता चौथीच्या पुस्तकातील पान क्र. 52 वरील निमंत्रण पत्रिका विद्यार्थ्यांना दाखवावी व निरीक्षण करण्यास सांगून पुढील

प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगा.

1) निमंत्रण कोणकोणत्या प्रसंगी दिले जाते?

2) तुमच्या शाळेकडून तुमच्या आई-वडिलांना कोणकोणत्या प्रसंगी निमंत्रण दिले गेले आहे?

3)निमंत्रणपत्रिकेत कोणकोणते मुद्दे असतात?

4) तू वाचलेल्या निमंत्रण पत्रिका कोणकोणत्या प्रसंगाच्या होत्या ?

शिक्षकांनी वरील प्रश्नांची विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरे वाचून विद्यार्थ्यांना निमंत्रणपत्रिका काय व कशासाठी असते, कधी तयार केली जाते, त्यातील महत्वाचे व अनिवार्य मुद्दे कोणते याबाबतीत विद्यार्थ्यांना कितपत माहिती आहे जे जाणून घेतील.


सराव करू या

शिक्षकांनी पुढील विषयावर विद्यार्थ्यांना निमंत्रण पत्रिका लिहायला

सांगावी.

पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही मित्र गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहात त्यासाठी गावातील व्यक्तींना निमंत्रित करणारी निमंत्रण पत्रिका लिहा.

कल्पक होऊ या

शिक्षकांनी निमंत्रण पत्रिकेबाबात पुढील कृती विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी. 1) कागदाचा वापर न करता व जलद वेळेत सर्वांपर्यंत निमंत्रण पत्रिका पोहचण्यासाठी काय कराल हे विद्यार्थ्यांना लिहायला सांगतील. ही पत्रिका पोहचविण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर कराल हे विद्यार्थ्यांना लिहायला सांगतील.

2) गावातील अभ्यासमालेचे उद्घाटन’ या विषयावर वरीलप्रमाणे निमंत्रण पत्रिका उपलब्ध आसलेल्या कागदावर विद्यार्थ्यांना तयार करायला सांगतील व वरीलपैकी विविध साधनांचा वापर करून मुलांच्या मित्र, गावातील ग्रामस्थ व शिक्षका व नातेवाईक यांना पाठवायला सांगतील..


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment