इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 40
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
खालील उताऱ्याचे वाचन करा
सुयांचे झाड
एका जंगल किनारी दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ लहान भावाशी दुष्टपणे वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे, त्याचे चांगले कपडे, वस्तू घेत असे. लहान भावाला वाईट वाटत असे.
एक दिवस मोठा भाऊ जंगलात लाकडे गोळा करायला गेला. तो झाडाच्या फांद्या तोडत असताना ते झाड त्याला म्हणाले, “कृपा करून माझ्या फांद्या तोडू नकोस रे, तू जर मला सोडून दिलेस तर मी तुला खूप सफरचंदे देईन.” हे ऐकून मोठ्या भावाला आनंद झाला. त्याने फांद्या कापायचे थांबवले आणि बघतो तर काय! झाडाला भरपूर सफरचंदे लागली होती. पण हावरट भावाचे समाधान झाले नाही. त्याने झाडाला धमकी दिली,” तू जर मला अजून जास्त सफरचंदे दिली नाहीस, तर मी तुझे खोडच कापून टाकेन.”
झाडाने सफरचंदे तर दिलीच नाहीत पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. तेव्हा धाकट्या भावानेच येऊन त्याची मदत केली. मग मात्र मोठ्या भावाला आपली चूक लक्षात आली. दुसऱ्याशी वाईट वागण्याचा काय परिणाम होतो हे त्याच्या लक्षात आले. तेव्हापासून तो धाकट्या भावाशी चांगले वागू लागला.