इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 37
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
सक्षम बनू या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिनदर्शिका दाखवावी.
दिनदर्शिकेच्या वाचनाकडे विविध प्रश्नांतून आणावे, जसे की
१) तुमच्या घरी तुम्ही अशी दिनदर्शिका पाहिली आहे का ? २) या दिनदर्शिकेतून आपल्याला काय माहिती मिळते ?
३) वार कोठे लिहिले आहेत ?
४) महिना कोठे लिहिला आहे ?
५) सर्व महिन्यात दिवसांची संख्या सारखीच आहे का ?
६) वार किती आहेत ?
७) महिने किती आहेत ?
८) इंग्रजी महिने व मराठी महिने यांची नावे वाच.
अशाप्रकारे विविध प्रश्न विचारून मुलांकडून दिनदर्शिकेचे वाचन करून घ्यावे.
दिनदर्शिकेचे वेगवेगळे पाने वाचनास देऊन, त्यावर आधारित प्रश्न विचारावेत.
• कल्पक होऊ या
विद्यार्थ्यांनी पुढील कृती कराव्यात.
आपल्या वर्गातील सर्व मुला-मुलींचे वाढदिवस आपल्या वर्गातील दिनदर्शिकेवर दाखवा, कोणाच्या वाढदिवशी कोणता वार येतो ते वाचा.
१) कोणाकोणाचे वाढदिवस सुट्टीच्या दिवशी आलेत ते वाचा आणि सांगा.
२) यावर्षी रक्षाबंधन कोणत्या इंग्रजी महिन्यात व कोणत्या वारी आले आहे ते सांग.
३) तुझ्या कुटुंबातील सर्वांचे वाढदिवस दिनदर्शिकेत शोधून वाच ( महिना, बार, तारीख)