♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी का होत आहे लाल ?

महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य म्हणून ओळखले जाते. मात्र, या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून लाल झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

लोणार सरोवरात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवकाची बुरशीची पाण्यात वाढ झाल्यामुळं पाण्याचा रंग लाल झाला असावा असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. तर, निसर्ग चक्रीवादळामुळं वातावरणात झालेला बदल व सरोवराच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानं पाणी लाल होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतंय. मात्र, अजून याबाबत कोणताही निष्कर्ष समोर आला नसून सरोवराच्या पाण्याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.

बुलडाणा परिसरात बेसॉल्ट नावाचा खडक सापडतो. लोणार सरोवरात खआरं पाणी असून ते अल्कलीधर्मी आहे. सरोवराचा आकारही अंडाकृती आहे.हे सरोवर उल्कापातामुळं तयार झालं आहे. लोणार सरोवराच्या जवळच पक्षी अभयारण्य देखील आहे.

लोणार येथे अभ्यासासाठी येणाऱ्या परदेशातील तथा देशातील शास्त्रज्ञांना सहकार्य करण्यासोबतच त्यांना येथील सविस्तर माहिती पुरविण्याचे काम करणारे वैज्ञानिक मार्गदर्शक आनंद मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार वातावरणातील झालेले बदल, वातावरणात निर्माण झालेला कोरडेपणा, सरोवर परिसरातील कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे सरोवराचे पाणी कमी झाले आहे. अशा बदलातूनच हा प्रकार झाला असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान लोणार येथीलच प्रा.डॉ.सुरेश मापारी यांनी काही जलतज्ज्ञांशी याबाबत चर्चाही केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हेलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवकाची (बुरशी) खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे कॅरोटेनॉईड नावाचा रंगयुक्त पदार्थ स्त्रवतो त्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला असावा. असे तज्ञ सांगत असल्याचे ते म्हणाले. मात्र आताच या वाढीची क्रिया एवढया मोठ्या प्रमाणात का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे त्यांचे म्हणणे आहे

उपयुक्त माहिती मित्रांसोबत शेअर करा.

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter