JioFiber: जिओ फायबरचा मोठा धमाका, आता मिळणार डबल डेटा – jio fiber is now offering double data monthly benefit on its annual subscription

[ad_1]

नवी दिल्लीःजिओ फायबरने एक मोठा धमाका केला आहे. जिओ फायबरने आपल्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लानमध्ये अतिरिक्त डेटा बेनिफिट देण्याची घोषणा केली आहे. जिओने आपल्या वेबसाईटवर अपडेट केले आहे. तसेच प्लान्ससोबत जास्त डेटा मिळणारा आता वेबसाईटवर दिसत आहे. जिओ फायबरच्या ब्राँज पासून टायटेनियम पर्यंत सर्व प्लान्समध्ये वार्षिक सब्सक्रिप्शनवर आता अतिरिक्त डबल डेटा दिला जात आहे. ज्या युजर्सकडे ब्राँज प्लानचे वार्षिक सब्सक्रिप्शन आहे. त्यांना आता या प्लानमध्ये दर महिन्याला ३५० जीबी डेटा मिळणार आहे. युजर्संना नवीन बेनिफिट अंतर्गत १०० जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे.

वाचाःBSNLचा नवा प्लान, एका दिवसात संपवा ९१ GB डेटा


सिल्वर प्लानमध्ये ८०० जीबी डेटा

जर एखाद्या युजरकडे ब्राँज प्लानचे मंथली रेंटल असेल तर त्यांना २५० जीबी डेटा मिळणार आहे. यात १०० जीबी प्लान बेनिफिट, लॉकडाऊनमुळे १०० जीबी डेटा बेनिफिट आणि ५० जीबी इंट्रोडक्ट्री डेटा बेनिफिट आहे. लॉकडाऊ थोडा-थोडा कमी केला जात आहे. त्यामुळे डबल डेटा बेनिफिट लवकर संपवला जाऊ शकतो. ब्राँज प्लानप्रमाणे, जिओ फायबरच्या सिल्वर प्लानचे वार्षिक सब्सक्रिप्शन घेतलेल्या युजर्संना अतिरिक्त डेटा मिळणार आहे. सिल्वर प्लान १२ महिन्याचे सब्सक्रिप्शन घेतलेल्या युजर्ससाठी दर महिन्याला ८०० जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये २०० जीबी प्लान बेनिफिट, २०० जीबी डबल डेटा बेनिफिट, २०० जीबी इन्ट्रोडक्टरी डेटा आणि २०० जीबी वार्षिक प्लानचा समावेश आहे.

गोल्ड प्लानमध्ये दर महिन्याला ७५०० जीबी डेटा

गोल्ड प्लानच्या वार्षिक सब्सक्रायबर्सला दर महिन्याला १७५० जीबी डेटा मिळणार आहे. यात ५०० जीबी वार्षिक प्लान बेनिफिट, २५० जीबी इंट्रोडक्टरी टेडा, ५०० जीबी लॉकडाऊन मुळे डबल डेटा बेनिफिट आणि ५०० एमबी प्लान बेनिफिटचा समावेश आहे. जर डायमंड प्लानचे सब्सक्रिप्शन घेतलेले युजर्सं असतील तर त्यांना दर महिन्यात ४००० जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. तर जिओ फायबरच्या गोल्ड प्लानच्या वार्षिक सब्सक्रायबर्स असलेल्या युजर्संना दर महिन्याला ७५०० जीबी डेटा मिळणार आहे. प्लानमध्ये २५०० जीबी प्लान बेनिफिट, लॉकडाऊन दरम्यान डबल डेटा बेनिफिट अंतर्गत २५०० जीबी डेटा २५०० जीबी वार्षिक बेनिफिटचा समावेश आहे. या प्लानमध्ये कोणतेही इंट्रोडक्टरी डेटा बेनिफिट मिळत नाही.

टायटेनियम प्लानमध्ये आता महिन्याला १५००० जीबी डेटा मिळणार आहे. प्लानमध्ये ५ हजार जीबी प्लान बेनिफिट्स, लॉकडाऊन दरम्यान ५००० जीबी डबल डेटा आणि ५००० जीबीचे वार्षिक प्लान बेनिफिट्चा समावेश आहे.

वाचाः नोकियापासून शाओमीपर्यंत, ५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन

वाचाः जिओचा जबरदस्त प्लानः ७३० GB डेटा आणि १ वर्षांपर्यंत रिचार्जची सुट्टी

वाचाः व्हॉट्सअॅपवरच्या या ५ चुका मोठे संकट बनू शकतात

[ad_2]

Source link

Leave a comment