[ad_1]
काय आहे जिओ लिंक What is Jio link?
जिओ लिंक एक ४जी मॉडम आहे. या लिंकमुळे काही ठिकाणी कव्हरेज चांगला बनवतो. हे जिओ फाय हॉटस्पॉटपेक्षा वेगळा आहे. जिओ कंपनीने सुरुवातीला जिओ लिंक सर्विस केवळ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध केली होती. रिलायन्स जिओ ४जी सर्विस लाँच केल्यानंतर आता जिओ मॉडमची खास गरज उरली नाही. परंतु, जर तुमच्याकडे जिओ लिंक मॉडम असेल तर काही प्लानसोबत रिचार्ज करून तुम्ही बेस्ट डेटा बेनिफिट घेऊ शकता.
जिओ लिंक युजर्संना तीन रिचार्ज प्लान करता येऊ शकता येते. यात ६९९ रुपयांत एक महिना, २०९९ रुपयांत तीन महिने आणि ४१९९ रुपयांत ६ महिन्यांच्या प्लानचा समावेश आहे.
६९९ रुपयांच्या प्लानमध्ये १५६ जीबी डेटा jio 699 plan
६९९ रुपयांच्या जिओ लिंक प्लानमध्ये दररोज ५ जीबी डेटा नुसार, तसेच १६ जीबी अतिरिक्त डेटासह १५६ जीबी डेटा युजर्संना मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. परंतु, युजर्संना या प्लानमध्ये व्हाईस कॉलिंग आणि फ्री एसएमएस दिला जात नाही.
सर्वात महागड्या प्लानमध्ये १०७८ जीबी डेटा
२०९९ रुपयांच्या जिओ लिंक प्लानमध्ये दरदिवस ५ जीबी डेटासोबत ४८ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. या नुसार, या प्लानमधये एकूण डेटा ५३८ जीबी डेटा आहे. या प्लानची वैधता ९८ दिवसांची आहे. जिओ लिंक सर्वात महाग ४१९९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ५ जीबी डेटा सोबत ९६ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. यानुसार, युजर्संना एकूण १०७६ डेटा मिळतो. या प्लानची वैधता १९६ दिवसांची आहे.
[ad_2]