[ad_1]
रिलायन्स जिओने नुकतेच भारतात वाय फाय कॉलिंग आणले आहे. हे देशभरात कोणत्याही वायफाय नेटवर्कवरून काम करू शकते. जर तुम्हाला आययूसीसाठी पैसे मोजायचे नसतील तर ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय होऊ शकतो. वायफाय कॉलिंग ही एक फ्री सर्विस आहे. यावरून ग्राहक आरामात व्हाईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग करू शकतो. सध्या वाय फाय कॉलिंगला १५० हून अधिक स्मार्टफोन्स सपोर्ट करीत आहेत. जर तुमच्याकडे वायफाय नेटवर्कचा अॅक्सेस नसेल तर तुम्ही कॉलिंगसाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा गुगल ड्युओ यासारख्या थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करू शकता. या अॅप्सचा वापर केल्यास तुमचे पैसे वाचवण्यात मदत होईल. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही FaceTime चा वापर करू शकता.
जिओने आपल्या अनेक प्रीपेड प्लान्सला अपडेट केले आहे. यात डेटासोबत दुसऱ्या नेटवर्क्ससाठी कॉलिंग मिनिट्स मिळतात. गरजेनुसार तुम्ही कोणताही एक प्लान निवडू शकतात. या प्लानचे सब्सक्राइबर्सला ६ पैसे प्रति मिनिट द्यावे लागणार नाहीत. IUC चार्ज म्हणजे एक टेलिकॉम ऑपरेटर आहे. जो दुसऱ्या ऑपरेटर युजर्सला कॉल देतो. आययूसी रेट ट्राय (टेलिकॉम रेग्युरेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया) कडून ठरवला जातो. सध्या यासाठी ६ पैसे द्यावे लागतात.
‘शाओमीचा सुपर सेल’ सुरू; ४ हजारांपर्यंत सूट
करोना व्हायरसमुळे Apple ला मोठे नुकसान
लाँच होण्याआधीच विराट वापरतोय ‘हा’ मोबाइल
[ad_2]
Source link