iqoo 3 : भारतात फेब्रुवारीत लाँच झालेला विवोचा ‘हा’ स्मार्टफोन स्वस्त – iqoo 3 set to get its first price cut

[ad_1]

नवी दिल्लीः विवोची सब ब्रँड iQoo ने फेब्रुवारीत आपला पहिला फोन iQoo 3 भारतात लाँच केला होता. लाँच होऊन दोन महिने होत नाही तोच कंपनीने या स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. फोनची किंमत किती कमी करणार हे मात्र कंपनीने अद्याप जाहीर केले नाही. कंपनीने आपल्या एका ट्विटमध्ये युजर्संना किंमत कमी करण्याचा अंदाज लावा असे म्हटले आहे.

वाचाः
वनप्लसचा ‘हा’ स्मार्टफोन ६ हजारांनी स्वस्त

iQoo 3 ची किंमत


भारतात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. त्यावेळी या स्मार्टफोनची किंमत ३६ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली होती. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची ही किंमत आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९० रुपये आहे. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४४ हजार ९९० रुपये आहे.

वाचाः
‘ड्रोना’चार्य मुंबईकर तरुणांचा तुमच्यावर ‘वॉच’

iQoo 3 वैशिष्ट्ये

या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. रिझॉल्युशन १०८०x२४०० पिक्सल आहे. डिस्प्लेत पंच होल कॅमेरा आणि डिस्प्लेत फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये २.८४ GHz ऑक्टाकोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. या फोनला ६ जीबी रॅम, ८ जीबी रॅम, १२ जीबी रॅमचा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये ४४४० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

वाचाः
बीएसएनएल आणि जिओ ग्राहकांसाठी गुडन्यूज

iQoo 3 मध्ये ४८ मेगापिक्सल कॅमेरा

या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर २०एक्स झूम दिला आहे. १३ मेगापिक्सल वाइड अँगल आणि डेप्थ सेन्सर मायक्रो आणि बुके फोटो मोड करते. यात नाइट मोड, सुपर वाइड अँगल पासून मायक्रो मोड पर्यंत फोटोग्राफीसाठी आहे. कमी प्रकाशात चांगले फोटो क्लिक करता येवू शकतात. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः
लॉकडाऊनः टाटा स्कायची पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’



[ad_2]

Source link

Leave a comment