How to aadhar update | आधारकार्डवरील चुका अशा करा दुरुस्त
तुमच्या जर आधारकार्डवर काही चूका असतील तर त्या आता तुम्हाला घरबसल्या aadhar update दुरुस्त करता येणार आहे.
काही सेंकदात तुम्हाला या चुका सुधारता येणार आहे आणि तुमचा वेळही वाचणार आहे. आधारकार्डवरील चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला या टीप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
आधारकार्डावरनाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्म दिनांक
यांसारख्या विविध चुका झाल्या असल्यास तुम्हाला त्याaadhar update
दुरुस्त करता येणार आहे.
Aadhar update करण्यासाठी आधारच्या अधिकृत वेबसाईटला https://uidai.gov.in/ भेट द्या
-
– वेबसाईटवर गेल्यानंतर खाली डाव्या बाजुला लिहिलेल्या माय आधारवर your aadhar data किंवा ‘आपकी आधार’ वर क्लीक करा
-
– तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे त्याबद्दल या पेजवर विचारलेलं असेल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये ‘सबमिट युअर अपडेट’वर क्लिक करा.
-
– ‘enter your aadhar number’वर तुमचा आधार क्रमांक टाका
-
– टेक्स्ट व्हिरिफिकेशनमध्ये स्क्रीनवर दाखवलेले स्पेशल कॅरेक्टर टाका आणि ‘ओटीपी’वर क्लिक करा
-
– याच्या पुढच्या पेजवर मोबाईल नंबर टाकण्याचे संकेत मिळतील. काही वेळात तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ‘ओटीपी’चा मॅसेज येईल. हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निर्धारीत बॉक्समध्ये नोंदवावा लागेल. यानंतर वेबसाईट लॉग इन करा.
-
– डाटा अपडेटवर क्लिक केल्यानंतर प्रोसेस्डवर क्लिक केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रांची क्लिअर फोटो किंवा स्कॅन करून अपलोड करावे लागतील.
-
– यानंतर ‘कन्फर्म’वर क्लिक करण्याचे आदेश मिळतील. यानंतर ‘बीपीओ सर्व्हिस प्रोव्हायडर’वर क्लिक करा. जिथे बाजुला लिहिलेल्या एजिस आणि कार्विसला निवडून सबमिट करावं लागेल.
-
– अपडेट झाल्यानंतर मोबाईलवर मॅसेज येईल. यामध्ये तुम्हाला ‘यूआरएन’ नंबर मिळेल. अपडेट स्टेटसवर आधार कार्ड नंबर आणि यूआरएन टाईप करावा लागेल.
अशाप्रकारे तुम्हाला आधार कार्डच्या माहितीमध्ये बदल करता येईल.
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook