Hero Super Splendor : हिरोची नवी सुपर स्प्लेंडर लाँच, पाहा किंमत – hero super splendor 125 bs6 launched in india; prices start at rs 67,300

[ad_1]

नवी दिल्लीः हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) ने आपली प्रसिद्ध बाइक हिरो सुपर स्प्लेंडर (Hero Super Splendor) नव्या रुपात म्हणजेच BS6 इंजिनसह लाँच केली आहे. ही बाइक सेल्फ ड्रम अलॉय व्हील आणि सेल्फ डिस्क अलॉय व्हील मध्ये उपलब्ध आहे. सेल्फ ड्रम अलॉय व्हिलची किंमत ६७ हजार ३०० रुपये तर सेल्फ डिस्क अलॉय व्हिलची किंमत ७० हजार ८०० रुपये आहे. कंपनीने सर्व BS4 मॉडेल्सचे उत्पादन बंद केले आहेत.

नवीन सुपर स्प्लेंडर मध्ये 125cc PFI (प्रोग्राम्ड फ्यूल इंजेक्शन) इंजिन देण्यात आला आहे. यात XSens टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. नवीन सुपर स्प्लेंडरचे पॉवर आउटपूट आउटगोइंग मॉडेलपेक्षा १९ टक्के जास्त आहे. हे इंजिन १०.७३ बीएचपी पॉवर आणि १०.६ एनएम टॉर्क जनरेट करते. हिरोच्या या बाइकमध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. बाइक हिरो आय३एस टेक्नॉलॉजी सह देण्यात आली आहे. गरज पडल्यास हे इंजिन स्वतः बंद होते तसेच इंजिन स्टार्ट होते. नवीन हिरो सुपर स्प्लेंडरमध्ये ग्राउंड क्लिअरन्स ३० एमएम वाढवून दिले आहे. या बाइकमध्ये आधीच्या तुलनेत ४५ एमएम लांब सीट देण्यात आली आहे. बाइकमध्ये २४० फ्रंट डिस्क ब्रेक दिले आहेत. तसेच बाइक १३० एमएम रियर ड्रम ब्रेक दिले आहे.

बाइकला आधीच्या तुलनेत जबरदस्त लुक देण्यात आला आहे. बाइकला ऑल न्यू मेटेलिक नेक्सस ब्लू शेडमध्ये लाँच केले आहेत. तसेच ही बाइक आणखी ३ रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. कँडी ब्लेजिंग रेड, ग्लेज ब्लॅक आणि हेवी ग्रे या तीन रंगात ही बाइक मिळणार आहे. कंपनीने आपली बीएस४ मॉडेल्सचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

‘या’ कंपन्यांच्या BS4 मॉडेल कारवर मोठा डिस्काउंट

न्यूरॉन EV1 बाइकला लाकडी टच, पाहा किंमत

ट्रम्प यांच्या ताफ्यातील ‘या’ कार भारतात फेल



[ad_2]

Source link

Leave a comment