Helo : करोनाः हेलो अॅपची ५ कोटींची आर्थिक मदत – helo mainbhicovidwarrior campaign for coronavirus in india

[ad_1]

नवी दिल्लीः सोशल मीडिया आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप हेलोने #मैंभीकोविडवॉरियर ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी हेलोने एनजीओ गिव इंडिया आणि अॅक्शन अॅड यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. या मोहिमे अंतर्गत हेलो २० हजार गरीब मजुरांच्या कुटुंबाना एक महिन्यांपर्यंत भोजन आणि स्वच्छता किट पुरवणार आहे. हेलोने यासाठी पाच कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

वाचाः
करोना व्हायरसः ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा

२० हजार गरीब मजुरांच्या कुटुंबाना एक महिन्यांपर्यंत भोजन आणि स्वच्छता किट पुरवण्याशिवाय हेलोने पंतप्रधान केअर्स फंड आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सीएम फंडला दोन कोटींची आर्थिक देण्याचे जाहीर केले आहे. हेलोची #मैंभीकोविडवॉरियर ही मोहीम अंतर्गत लोकांनी पुढे येऊन गिव इंडियाच्या या मोहिमेला मदत करण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहेत. कंपनीने आपल्या प्लेटफॉर्मवर #मैंभीकोविडवॉरियर ही मोहीम सुरू केली आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आरोग्य मंत्रालय आदी विश्वसनीय माहितीची १४ भाषेत अपडेट दिले जात आहे. कंपनीने अॅपमध्ये दान या नावाचे एक बटनही सुरू केले आहे. हे बटन क्लिक केल्यानंतर त्यात तुम्हाला दान करता येवू शकते.

वाचाः
१९२ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा स्मार्टफोन येतोय

करोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी जगभरातील सरकारने आपली आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारला मदत करण्यासाठी जगभरातील कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. अनेक जण पुढे येऊन आर्थिक मदत करीत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. मायक्रो ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर Twitter चे सीईओ डोर्सी यांनी करोना विरूद्धच्या लढाईसाठी १ अब्ज डॉलरची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

वाचाः
Whatsapp चे व्हिडिओ कॉलमध्येही नवे फीचर



[ad_2]

Source link

Leave a comment