♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

ग्रीन, ऑरेंज आणि रेडझोनमध्ये कोणत्या सेवा सुरु होणार? जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रीन, ऑरेंज आणि रेडझोनमध्ये कोणत्या सेवा सुरु होणार? जाणून घ्या एका क्लिकवर

      देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसमुळं 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे.

मात्र तरीसुद्धा ग्रीन, ऑरेंज आणि रेडझोनमध्ये असलेल्या काही सेवांना, तसेच दुकानांना या लॉकडाऊमधून शिथिलता देण्यात आली आहे.

    उद्यापासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊन 3.0 मधून अनेक सुविधांना मुभा देण्यात आली आहे.  अनेक ठिकाणी आता दुकानं सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत माहिती देतांना असं म्हंटल आहे की अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सुरू होतील

     तसेच काही ठिकाणी खासगी व सरकारी कार्यालयेही सुरू होतील. विशेष म्हणजे, काही ठिकाणी आंतरजिल्हा बसेसही सुरू होणार आहेत.

दरम्यान ग्रीन, ऑरेंज, आणि रेड झोनमध्ये कोणत्या सेवा सुरु होणार आहे. यावर एक नजर टाकूया.

रेड झोनमध्ये काय सुरू होणार ?

 • मेडीकल, छोटे क्लिनिक, दवाखाने
 • कंन्टेन्मेन्ट झोनबाहेर चारचाकी वाहनात चालकासह दोघांना मुभा
 • कंन्टेन्मेन्ट झोनबाहेर दुचाकीवर एका व्यक्तीला मुभा
 • सर्व वस्तुं, मालाचा पुरवठा
 • कंन्टेन्मेन्ट झोनबाहेरची इतर दुकानं, दारुची दुकानं
 • उद्योग, शहरी उद्योग, सिटुची बांधकामे
 • जीवनावश्यक सेवांची दुकानं
 • ई-कॉमर्स सेवेतून मिळणाऱ्या वस्तू
 • खासगी कार्यालयांना 33 टक्के क्षमतेसह मुभा
 • सरकारी कार्यालयांमध्ये 33 टक्के क्षमतेसह मुभा
 • सर्व कृषीविषयक व्यवहार
 • बँक, वित्तसंस्था सुरू राहणार
 • कुरियर, पोस्टल सेवा सुरू राहणार

ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये काय सुरू होणार ?

 • मेडीकल, छोटे क्लिनिक, दवाखाने
 • स्पा, हेअर सलूनलाही परवानगी
 • कन्टेन्मेन्ट झोनबाहेरची इतर दुकानं, दारुची दुकानं
 • टॅक्सी कॅब सेवेला दोन प्रवाशांसह मुभा
 • चारचाकी वाहनात चालकासह दोघांना मुभा
 • दुचाकीवर एका व्यक्तीला मुभा
 • सर्व वस्तुं, मालाचा पुरवठा
 • उद्योग, शहरी उद्योग, सिटुची बांधकामे
 • जीवनावश्यक सेवांची दुकानं
 • ई-कॉमर्स सेवेतून मिळणाऱ्या वस्तू
 • खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेसह मुभा
 • सरकारी कार्यालयांना पूर्ण क्षमतेसह मुभा
 • सर्व कृषीविषयक व्यवहार
 • बँक, वित्तसंस्था सुरू राहणार
 • कुरियर, पोस्टल सेवा सुरू राहणार