Google India : व्हॅलेंटाइन डेः सिंगल मुलांना गुगलनंही केलं ट्रोल – valentines day 2020 google india trolls single users recommends tanhaai song

[ad_1]

नवी दिल्लीः व्हॅलेंटाइन डे ला ‘प्रपोज डे’ पासून सुरुवात झाली आहे. हा आठवडा प्रेमी युगुलांसाठी खास असणार आहे. जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात येणार आहे. प्रेमी युगुलांनी त्याची तयारीही सुरू केली आहे. परंतु, सिंगल मुलांचं काय?, सिंगल असणाऱ्या मुलांना अनेक जण टोमणा मारतात. यावेळी गुगलनेही त्यांना चिमटा काढला आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव असलेले मित्र आपल्या मित्रांना सिंगल असल्यावरून ट्रोल करतात. आता गुगलनेही सिंगल मुलांना ट्रोल करण्याचे ठरवलेले दिसत आहे.

सर्च इंजिन Google India ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे. यात कंपनीने Valentine’s Day 2020 ला एका वेगळ्या अंदाजात लिहिले आहे. तसेच Youtube India वर सिंगल मुलांसाठी ‘Tanhaaai’ हे गाणे गायचा सल्ला दिला आहे. या नावावरून कोणते गाणे आहे. हे माहिती नसले तरी ‘तनहाई’ या शब्दावरून अनेक सिंगल मुलं नक्कीच ट्रोल होतील.


तर, दुसरीकडे यूट्यूब इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलने गुगलच्या या ट्विटला आपल्या अंदाजात रिप्लाय दिला आहे. सिंगल लोकांना ट्रोल करण्याऐवजी त्यांना पाठिंबा दिला आहे सिंगल लोक म्हणजे कॉम्रेड आहेत, असे यूट्यूब इंडियाने म्हटले आहे.

दोन्ही ट्विटर हँडलच्या या गंमतीदार ट्विटवर अनेक भारतीयांनी रिप्लाय केला आहे. सर्वांना गुगल इंडिया आणि यूटयूब इंडियाचा हा देसी अंदाज आवडला आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment