[ad_1]
अॅपलचा लेटेस्ट स्मार्टफोन iPhone 11 आणि iPhone 11 Pro खरेदी करायचा असेल तर यावर कोणतेही व्याज लावण्यात आले नाही. ईएमआयवर हे दोन्ही फोन खरेदी करता येऊ शकते. यावर एचडीएफसी बँक सूटही देत आहे. iPhone 11 फोनची किंमत कमी केली नसली तरी हा फोन ईएमआयवर बिनव्याजी खरेदी करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना ७ हजारांची सूट देण्यात आली आहे. अॅपलचा ६४ जीबीचा iPhone XS फ्लिपकार्टवर ५४ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. या फोनची किंमत ५९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या सूटसह ई-कॉमर्स साइटवर आयफोन एक्सएसवर एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे.
आयफोन एक्सआरच्या किंमतीतही कपात करण्यात आली नाही. परंतु, हा फोन ८ हजार ३१७ रुपयांच्या मासिक हप्त्यावर कोणतेही व्याज न देता खरेदी करता येऊ शकतो. यावर एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ५ हजारांची सूट दिली जाणार आहे. iPhone 8 चा ६४ जीबी वर डिस्काउंट दिला असून हा फोन ३४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. Flipkart Apple Days सेल मध्ये iPhone 7 २४ हजार ९९९ रुपयांना तर iPhone 7 Plus हा फोन ३३ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकणार आहे. iPhone 6s चा ३२ जीबीचा मॉडेल केवळ २३ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी या सेलमध्ये मिळणार आहे.
‘शाओमीचा सुपर सेल’ सुरू; ४ हजारांपर्यंत सूट
करोना व्हायरसमुळे Apple ला मोठे नुकसान
[ad_2]
Source link