खाजगी शाळा मनमानी शुल्क वाढवाण्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून येत असतात. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शुल्क नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहेत. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ही माहिती दिली
शुल्क नियंत्रण समिती आठ जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे. माजी जिल्हा न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. याआधी पालक, विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी शिक्षण उपसंचालक, उपसंचालकांकडे जायच्या. त्यांचा निपटारा होत नव्हता.
पालकांना यामुळे नाहक मनस्थापाला सामोरे जावे लागायचे. यासाठी आता समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या. या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळणार आहे.
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook