Fake customer care : गुगलवर फेक हेल्पलाइन नंबर टाकून लोकांना चुना – fake customer care and helpline number on google be alert

[ad_1]

नवी दिल्लीः गुगलवर हेल्पलाइन नंबर शोधणे आता चांगलेच महागात पडू शकते. गुगलवर सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. हेल्पलाइनच्या जागी मोबाइल नंबर टाकून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्यामुळे गुगलवर कोणत्याही बँक, डिजिटल पेमेंट वॉलेट, इन्शूरेन्स, रेल्वे, कुरियर, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी यासारख्या कंपन्यांचे हेल्पलाइन नंबर्स शोधणे महागात पडू शकते.

वाचाः
‘ड्रोना’चार्य मुंबईकर तरुणांचा तुमच्यावर ‘वॉच’

कसं वाचू शकाल या फेक नंबर्सपासून

>> बँक, वॉलेट, रेल्वे, कुरियर, बँक आदींची अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन नंबर्सवर कॉल करा.

>> गुगल यासारख्या सर्च इंजिनावर सर्च केल्यानंतर रिझल्ट नेहमी फेक येतो. त्यामुळे त्या नंबरची तपासणी अधिकृत साईटवर जाऊन नेहमी करा.

>> अनेक कंपन्यांचे हेल्पलाइन नंबर्स टोल फ्री असतात. या नंबर्सची सुरूवात १८०० पासून होते.

>> हेल्पलाइन नंबर्सवर कोणत्याही परिस्थितीत बँक खाते, पॅन कार्ड, आधार कार्ड संदर्भातील कोणतीही माहिती मागितली जात नाही. जर कोणी अशी माहिती मागितली तर तो फोन तत्काळ बंद करा.

वाचाः
बीएसएनएल आणि जिओ ग्राहकांसाठी गुडन्यूज

>> आपल्या मोबाइलवर आलेला मेसेज लक्षपूर्वक वाचा. मेसेजमध्ये आलेला ओटीपी किंवा कोड चुकूनही कुणाला सांगू नका.

>> जर हेल्पलाइनवरील व्यक्ती तुम्हाला कोणती लिंक पाठवत असेल आणि तिला तो क्लिक करायला सांगत असले तर चुकूनही ती लिंक ओपन करू नका. तसेच एखादा अॅप डाऊनलोड करायला सांगितल्यास तो करू नका.

>> या लिंक्स आणि अॅपच्या माध्यमातून तो तुमचे बँक खाते आणि फोनमधील माहिती चोरी करू शकतो.

>> हेल्पलाइनवर बोलणारा व्यक्ती जर अॅक्सेसचे अॅप Anydesk, Quick Support, Airdroid डाऊनलोड करायला सांगत असेल तर ते डाऊनलोड करू नका.


>>
या अॅपच्या माध्यमातून तो दुरून तुमचा मोबाइलवर कंट्रोल करू शकतो.


वाचाः WhatsApp चे युजर्संसाठी ‘स्टीकर पॅक’ लाँच



[ad_2]

Source link

Leave a comment