[ad_1]
न्यूज अँकर साक्षी जोशी यांनी नुकताच तिरूपती त्रिमाला मंदिराबद्दल एक दावा केला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर देशभरात करोना व्हायरसचे नव नवीन प्रकरणे समोर येत असल्याने तिरूपतीमधील तिरूमाला मंदिर गुपचूप बंद करण्यात आले आहे, असा दावा साक्षी जोशी यांनी केलाय.
चलो इन्होंने भी एहसान कर दिया आखिरकार मंदिर बंद करके । देखा होगा #TablighiJamaat टारगेट पर है। हम चुपके से बंद करके… https://t.co/XlDyFKXG0L
— Sakshi Joshi (@sakshijoshii) 1585716135000
इंडिया टूडेची ३१ मार्च २०२० रोजीची एक बातमी शेअर करीत जोशी यांनी हा दावा केला आहे. तबलिगी जमात सध्या देशात लक्ष्य असल्याने तिरुपती मंदिराने गुपचूप पणे आपले मंदिर बंद केले आहे. त्यांना वाटत असेल की, आता कुणालाही माहिती पडणार नाही. परंतु, पूजा आताही थांबणार नाही. एकांतात ही पूजा चालूच राहणार आहे, नाही का?
@FrustIndian समझ गई तुम्हें अंग्रेजी पढ़नी नहीं आती छद्म से भी नीचे के लेवल के ट्रोल। 31 मार्च की खबर है। 50 sub… https://t.co/g5BmyFfx3U
— Sakshi Joshi (@sakshijoshii) 1585747841000
एका ट्विटर युजरला साक्षी जोशींनी रिप्लाय सुद्धा दिला आहे. ५० सब मंदिर बंद झाले नव्हते. ते आता बंद करण्यात आले आहे. मंदिरात २-३ तारीखची पूजा आताही होईल, असेही साक्षीने म्हटले आहे.
खरं काय आहे?
तिरूपती मंदिर हे २० मार्च २०२० रोजी बंद करण्यात आले आहे. त्यात ५० छोट्या मंदिराचाही समावेश आहे. जोशींनी चुकीचा दावा केला आहे.
कशी केली पडताळणी ?
आम्ही सर्वात आधी जोशींनी शेअर केलेली इंडिया टुडेची
बातमी तपासली. त्या बातमीत तिरुमाला तिरुपती डेवस्थान (टीटीडी) बोर्डाने लॉर्ड वेंकटेश्वरा १४ एप्रिल पर्यंत वेगळा करण्याची घोषणा केली होती. परंतु, कोणत्या दिवशी केली याची माहिती दिली नव्हती.
देशभरातील भाविक या ठिकाणी येत आहेत. तिरुमाला तिरुती मंदिराचे रूपडे पालटले आहे. परंतु, देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे टीटीडी बोर्डाने १४ एप्रिल पर्यंत लॉर्ड वेंकटेश्वरा १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाविकांना श्रीवरी (लॉर्ड) दर्शन (मुख मंदिर) हे भाविकांसाठी १४ एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याचे बोर्डाने आधीच जाहीर केलेले आहे. तसेच टीटीडी बोर्डाने आधीच ३१ मार्च पर्यंत तिरुमाला मंदिराचे दर्शन बंद केले होते. मुख्य मंदिर आणि ५० छोटे मंदिर सुद्धा बंद करण्यात आले आहे.

‘Tirupati Temple Tirumala closed’ हे कीवर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाची १९ मार्च २०२० रोजीची एक
बातमी मिळाली.
या बातमीचे शीर्षक ‘Coronavirus scare: Tirumala temple to be closed for pilgrim worship, temple rituals will go on’, असे होते. या बातमीत म्हटले की, मंदिर २० मार्चपासून बंद करण्यात आले आहे.
२० मार्च पासून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे. देशभरात कोविड १९ चे रुग्ण आढळत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हा निर्णय घेतला होता, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. टीटीडीच्या अधिपत्याखाली असलेल्या देशभरातील छोटे ५० मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
त्यानंतर आम्हाला २५ मार्च २०२० ची द न्यूज मिनटची एक
बातमी मिळाली. त्या बातमीत स्पष्टपणे म्हटले की, मंदिर ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहे.

या बातमीची शीर्षक ‘Tirumala Tirupati temple to be shut for devotees till March 31 as TTD extends closure’, असे होते. या बीतमीत टीटीडीने २४ मार्च २०२० रोजी स्पष्ट केले होते की, भाविकांसाठी मंदिर ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर करोनाचा संसर्ग देशात वाढू लागल्याने ही मंदिर बंदची डेडलाइन १४ एप्रिल २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यावरून स्पष्ट होते की, तिरुपती मंदिर ५० छोट्या मंदिरासह २० मार्च २०२० पासून बंद आहेत. तबलिगी जमातीच्या प्रकरणानंतर मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही.
निष्कर्ष
तबलिगी जमातीच्या प्रकरणानंतर तिरूपती मंदिराचे ५० छोटे मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा साक्षी जोशी यांनी जो दावा केला आहे. तो दावा खोटा आहे, तिरूपती मंदिर ३१ मार्च पासून बंद करण्यात आल्याचा दावाही खोटा आहे, हे मंदिर २० मार्च पासून बंद करण्यात आले आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
[ad_2]
Source link