[ad_1]
वेबसाइटने हा दावा गिरधर ज्ञानी यांच्या हवाल्याने केला आहे. गिरधर ज्ञानी यांना या रिपोर्टमध्ये एक डॉक्टर म्हटले आहे. जे नीती आयोगकडून तयार करण्यात आलेल्या कोविड १९ हॉस्पिटल टास्क फोर्सचा एक भाग आहे.
ज्ञानी यांच्या हवाल्याने या वेबसाइटने चुकीचा दावा केला आहे. भारतात करोना व्हायरसचा कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाले आहे. परंतु, सरकार हे सार्वजनिक करीत नाही.
येथे पाहा, या रिपोर्टचा स्क्रीनशॉट

खरं काय आहे?
गिरधर ज्ञानी यांनी स्वतः हे स्पष्ट केले आहे की, या बातमीचे शीर्षक चुकीचे आहे. त्यांच्या माहितीनुसार, वेबसाइटने ज्या दिवशी माझी मुलाखत घेतली होती, त्या दिवशी आकडेवारीनुसार, भारतात ट्रान्समिशनचा तिसरा टप्पा सुरू झाला नव्हता.
न्यूज एजन्सी एएनआयच्या हेल्थ रिपोर्टर प्रियांका शर्मा यांच्याशी बोलताना डॉक्टर ज्ञानी यांनी स्पष्टपणे म्हटले की, सुदैवाने करोना व्हायरसचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. नाहीतर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या स्थितीत रुग्ण मोजणे कठीण होत असते.
ANI’s health reporter @journo_priyanka reached out to Dr Girdhar Gyani who says this headline was blown out of prop… https://t.co/cBOjKR9Slj
— ishaan prakash (@ishaan_ANI) 1585325280000
तसेच, डॉक्टर ज्ञानी हे मेडिकल प्रॅक्टिशनर नाही, किंवा या रोगाचे ते जाणकार नाहीत. त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर क्वॉलिटी मॅनेजमेंट मध्ये पीएचडी केली होती. सध्या ते असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाईडर्स (इंडिया) चे संचालक आहेत.
या ठिकाणी पाहा त्यांचा प्रोफाइल

एएचपीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून हा रिपोर्ट बनावट असल्याचे म्हटले आहे. या ट्विट मध्ये एएचपीआय ने म्हटले, डॉक्टर ज्ञानी ने मुलाखतीत म्हटले होते. आम्ही आता तिसऱ्या टप्प्यात नाही. परंतु, जर आपण अशी तयारी केली पाहिजे जसे तिसरा टप्पा आहे. तर त्याचा फायदा होईल.
Misleading article from The Quint on COVID-19 referring Dr Girdhar Gyani,DG.AHPI -Interview Dated 27.3.2020… https://t.co/pYHbCevwYY
— Association of Healthcare Providers (India) – AHPI (@ahpi_india) 1585331912000
इतकेच नाही, तर डॉक्टर ज्ञानी कोविड १० साठी नीती आयोगाच्या अंतर्गत बनलेल्या पब्लिक हेल्थ एक्सपर्ट्सच्या हायलेवलच्या टेक्निकल कमिटीचे सदस्य नाहीत.
या ठिकाणी पाही, काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)चे संचालक जनरल प्राध्यापक बलराम भार्गव यांचे पत्र. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव यांना पाठवलेल्या या पत्रात नीत आयोगाचे सदस्य डॉक्टर विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखाली २१ पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट्सचे नाव आहेत. याच पत्रात डॉक्टर ज्ञानी यांचे नाव नाही.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या फॅक्ट चेक टीमने सुद्धा आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एएचपीआयच्या ट्विटला कोट करून हा रिपोर्ट खोटा असल्याचे म्हटले आहे.
#PIBFactcheck : An online news portal has carried an interview with DG, AHPI claiming that India is in Stage 3 i.e… https://t.co/d4BEAq9Uml
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) 1585387235000
रिपोर्टला भ्रमित करण्यात आल्यानंतर AHPI च्या ट्विटनंतर वेबसाइटने याचे शीर्षक बदलले. आता या रिपोर्टचे शीर्षक ‘India May be in Stage 3: COVID-19 Hospital Task Force Convener’असे केले आहे.
निष्कर्ष
प्रसिद्ध मीडिया संस्थेने भारतात करोना व्हायरस तिसऱ्या टप्प्यात असल्याचा भ्रमित करणारा रिपोर्ट प्रकाशीत केला आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
[ad_2]
Source link