Fact Check : Fact Check: करोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात डॉक्टरचा मृत्यू ? – fact check: did this female indian doctor die because of coronavirus?

[ad_1]

दावा

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर दोन फोटो या दाव्यासह शेअऱ करण्यात येत आहे की, महाराष्ट्रात मनीषा पाटील नावाच्या एका २८ वर्षीय महिला डॉक्टरचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. काही पोस्ट्मध्ये हाही दावा करण्यात आला आहे की, मनीषा पाटील यांनी एकूण १८८ करोना व्हायरस रुग्णांची तपासणी केली होती. तसेच त्यांना बरे केले होते. परंतु, त्या स्वतःला वाचवू शकल्या नाही.

पोस्टसोबत दोन फोटो शेअर केले जात आहेत. पहिल्या फोटोत महिला डॉक्टर दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत हॉस्पिटलच्या एका खोलीचा फोटो दिसत असून त्यात दोघे जण बसलेले दिसत आहेत.

या ठिकाणी पाहा व्हायरल पोस्ट

खरं काय आहे ?

व्हायरल झालेल्या पोस्टमधील दावा साफ खोटा आहे. या दाव्यासोबत जो फोटो शेअर केला जात आहे. तो फोटो डॉक्टर ऋचा राजपूत यांचा आहे. त्या कानपूरच्या रहिवासी आहेत. ऋचा होमियोपॅथीच्या डॉक्टर आहेत. तसेच सध्या त्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठाी लोकांना ऑनलाइन काउंसलिंगची मदत करीत आहेत.

कशी केली पडताळणी ?

व्हायरल फोटोला गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला डॉक्टर ऋचा राजपूत नावाची एक ट्विटर प्रोफाईलमधून केलेल्या एका ट्विटची लिंक मिळाली. या ट्विटमध्ये एका बाजुला व्हिडिओ आणि दुसऱ्या बाजुला हाच फेसबुकवर शेअर होत असलेला स्क्रीनशॉट आहे. जो आता व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ट्विटर युजरने म्हटले की, आम्ही सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. काही लोकांनी तो चुकीचे कॅप्शन देऊन व्हायरल केला. माझ्याकडे शेकडो लोक कालपासून आले आहेत. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की, माझे नाव डॉक्टर ऋचा राजपूत आहे. मी कानपूरची रहिवासी आहे. मी एकदम सुरक्षित व तंदुरूस्त आहे. मी करोना रुग्णांच्या संपर्कात आली नाही किंवा त्यांच्याशी सरळ जोडली गेली नाही. मी रुग्णांसोबत ऑनलाइन काउंसलिंगचे काम करीत आहे.

टाइम्स फॅक्ट चेकने ऋचा राजपूत यांच्याशी संपर्क केला. ऋचा यांनी आम्हाला सांगितले की, मी हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. पण, माहिती नाही कुणी हा खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल केला. माझ्या कॉलेजमधील मित्रांनी मला मेसेज करणे सुरू केले. मी ठीक आहे आणि कानपूरमध्ये राहते. मी सध्या रुग्णांसाठी ऑनलाइन काउसलिंगचे काम करीत आहे. मी भाजपची सक्रीय सदस्य आहे, असेही ऋचाने सांगितले. ऋचाच्या ट्विटर बायोमध्ये सुद्धा भाजपचा उल्लेख आहे.

ऋचाचा जो फोटो सोशल मीडियावर खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. तो फोटो त्यांनी २५ एप्रिल रोजी ट्विट केला होता.

तसेच महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे रुग्णांचा उपचार करताना कोणत्याही डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही.


निष्कर्ष

करोना व्हायरसच्या रुग्णांचा उपचार करताना डॉक्टरचा मृत्यू झाला आहे, असा जो खोट्या दाव्यासह महिला डॉक्टरचा फोटो शेअर केला जात आहे. तो फोटो डॉक्टर ऋचा राजपूत यांचा आहे. व त्या सुरक्षित आहेत, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment