इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 40
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका 23
चला समजून घेऊया चुंबकत्व, चुंबकीय बलरेषा, बलरेषांचे गुणधर्म, चुंबकाचे गुणधर्म संदर्भ: इयत्ता 7 वी प्रकरण 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
अध्ययन निष्पत्ती शास्त्रीय संकल्पनांचे दैनंदिन जीवनात उपयोजन करता येते, चुंबक आणि चुंबकीय पदार्थ यांतील फरक ओळखता येतो, चुंबकत्याशी संबंधित विविध कृती करता येतात. चुंबकाचे उपयोग, इ. लक्षात घेऊया :
लोह, कोबाल्ट व निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात. ‘विपरमँग’ या लोह, निकेल, अॅल्युमिनिअम व टायटॅनिअम यांच्या संमिश्रा पासून चुंबक बनवतात. तसेच ‘अल्निको’ हे अॅल्युमिनिअम, निकेल व कोबाल्ट यांच्यापासून बनवलेले चुंबकीय संमिश्र आहे. पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण करण्यासाठी एकस्पर्शी पद्धती व द्विस्पर्शी पद्धतीचा वापर केला जातो.
टांगलेल्या चुंबकाचा उत्तरध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिरावतो. याचा अर्थ पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे, परंतु या चुंबकाचा दक्षिणध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी, तर चुंबकीय उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी असला पाहिजे. असे अनुमान विल्यम गिल्बर्टने यांनी काढले.
मायकेल फॅरेडे यांनी लोहचचुंबक व लोहकीस यांच्यावरील प्रयोगाच्या साहाय्याने चुंबकीय बलरेषा ही सकंल्पना स्पष्ट केली. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषांवरून समजते. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. चुंबकीय बलरेषा या नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंबकीय क्षेत्र हे पुठ्ठा, पाणी, काच इत्यादी पदार्थातून आरपार जाऊ शकते. मात्र असे होताना चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी झालेली आढळते.