♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 37

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 


कृतिपत्रिका : 20

समजून घेऊ या खनिजे आणि धातुके, इंधन, वनसंपत्ती संदर्भ : इयत्ता सातवी प्रकरण 16 नैसर्गिक साधनसंपत्ती

अध्ययन निष्पत्ती : नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण करून त्यांचे उपयोग स्पष्ट करणे

लक्षात घेऊ या :

भूकवचातील साधनसंपत्ती- भूकवचातील साधनसंपत्ती मध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये, इत्यादींचा समावेश होतो.

खनिजे आणि धातुके – पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात. बहुतेक सर्व धातू संयुगाच्या स्वरूपात आढळतात. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातुक म्हणतात. धातुकांपासून धातू किफायतशीररीत्या

मिळवता येतात.

खनिजे कशी तयार झाली? – भूकवचातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारस थंड झाल्याने त्याचे स्फटिकांत रूपांतर होऊन खनिज निर्मिती होते. बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायुरूप स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिज निर्मिती होते.

इंधन – दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थाना इंधने असे म्हणतात. इंधने स्थायू, द्रव, वायू या अवस्थेमध्ये आढळून येतात.

दगडी कोळसा (Coal) – लाखो वर्षांपूर्वी नैसर्गिक घडामोडींमुळे जंगले जमिनीत गाडली गेली. त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला, त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन (Fossil Fuel) म्हणतात. पीट, लिग्नाइट (ब्राउन कोल), बिट्युमिनस कोल, अँथ्रासाइट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. अँथ्रासाइट हा उच्च प्रतीचा कोळसा आहे.

खनिज तेल – जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय. लाखो वर्षांपूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्यांच्या वर माती व वाळूचे थर जमा झाले जास्त दाब व उष्णता यांमुळे या मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतरण झाले.

पेट्रोलिअम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन तसेच गंधकाची संयुगेही असतात. पेट्रोलिअमपासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅप्था, वंगण, डांबर हे घटक मिळतात.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी