इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 43
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका : 27
समजून घेऊया: सूर्यमाला, सूर्यमालेतील ग्रह संदर्भ: इयत्ता सहावी, प्रकरण 16 विश्वाचे अंतरंग अध्ययन निष्पत्ती :
1) विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह उपग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात. 2) इंटरनेट, माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्रे वापरून विविध संकल्पना, प्रक्रिया यांची माहिती घेतात.
लक्षात घेऊ या:
सूर्यमाला
सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत. यात बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. बहिर्ग्रहांभोवती कडी असतात. अंतर्ग्रहाचे कवच कठीण असते. तर बहिर्ग्रहाचे बाह्यावरण वायुरूप असते.

सूर्य –
हा पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस इतके आहे. पृथ्वीएवडे 13 लाख ग्रह मावतील एवढा सूर्याचा आकार मोठा आहे.

बुध :
हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फल सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्यालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे.

शुक्र
हा सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी ग्रह आहे. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र हा सर्वात तर ग्रह आहे.

पृथ्वी
हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीव नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात.

मंगळ
हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो. म्हणून त्याला ‘लाल ग्रह’ असेही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ‘ऑलिम्पस मॉन्स’ हा आहे.

गुरू
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. गुरु ग्रह आकाराने प्रचंड असूनसुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी यह असेही म्हणतात.

शनी
सूर्यमालेतील सहावा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे. कारण त्याच्या भोवती कड़ी आहेत. त्यांचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा, एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी टाकला, तर तो चक्क तरंगू शकेल.

यूरेनस:
हा सूर्यमालेतील सातवा ग्रह आहे. या ग्रहाला दुर्बिणी शिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो.

नेपच्यून :
हा सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात.


