इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 38
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास
कृतिपत्रिका 22
समजून घेऊ या हवामानानुसार कपड्यांतील विविधता
संदर्भ: इयत्ता 3 री, पाठ 24 आपले कपडे
अध्ययन निष्पत्ती विभिन्न स्थान, कृती, वस्तू विषयी आपली निरीक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात.
लक्षात घेऊ या :
वर्षभर हवामान सारखे नसते. हवेतील या नियमित होणाऱ्या बदलांमुळे वर्षाचे तीन भाग पडतात. त्यांना ऋतू म्हणतात. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू एकामागून एक सतत येत असतात.
ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होत असतात. माणूस व इतर सजीवांच्या जीवनावर ऋतूंचा मोठा परिणाम होत असतो. प्रत्येक ऋतुमानानुसार आपण आहारात बदल करतो व वेगवेगळे कपडे वापरतो.
उन्हाळा
- उन्हाळा उन्हाळ्यात खूप उष्णता असते, खूप गरम होते, खूप घाम येतो, उकाडा होतो. आशा वातावरणात आपण पातळ व सुती कपडे वापरतो. ऊन लागू नये म्हणून टोपी
घालतो.
- पावसाळा पावसाळ्यात पावसापासून बचाव व्हावा म्हणून आपण छत्री, रेनकोट,
गमबुट वापरतो. I
- हिवाळा हिवाळ्यात खूप थंडी वाजते, म्हणून आपण लोकरीचे उबदार कपडे वापरतो.
स्वेटर, कानटोपी, हातमोजे, मफलर इ. कपडे वापरतो.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- हिवाळ्यात आपण जसे उबदार कपडे वापरतो, तसे कपडे उन्हाळ्यात वापरले तर काय होईल ?
- घरातील पाळीव प्राणी तसेच गाई-गुरे यांचे हिवाळ्यात थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी काय करता येईल ?
- खालील चित्रे पहा व त्याखाली ऋतूंची नावे लिहा.
5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी