इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 42

विषय  – इतिहास – भूगोल  

थोडे आठवूया!

पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.

1 क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक नसते.

2 क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय.

3 क्षेत्रभेटीदरम्यान मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते.

4 प्रदेशानुसार व गरजेनुसार विविध क्षेत्रांतील लोकांच्या उपजीविकेच्या साधनांचा फरक पडतो.

प्रश्नावली

खेडेगावची माहिती मिळवताना या प्रश्नावलीचा उपयोग करा.

1 क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या खेडेगावाचे नाव काय?

2 गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का ? असल्यास माहिती संकलित क

3 तुमच्या गावापासून त्या खेडयाचे अंतर किती किलोमीटर आहे?

4 हे खेडेगाव तुमच्या गावाच्या कोणत्या दिशेस आहे?

5 खेडेगावाला जाण्यासाठी रस्ता कोणत्या प्रकारचा आहे?

6 गावात ग्रामपंचायत कार्यालय आहे का?

7 गावाच्या जवळचे मोठे शहर कोणते?

8 गावाला जाण्यासाठी वाहतुकीची कोणती साधने आहेत?

9 है गाव व सभोवतालचा प्रदेश कोणत्या प्राकृतिक विभागात येतात ? (पर्वतीय पठारी किया मैदानी) 10 गावात कोणत्या रंगाची मृदा आढळते?

11 गावाच्या परिसरात नदी तलाव, इत्यादी जलस्त्रोत आहेत का? असल्यास त्यांची नावे लिहा .गावाच्या कोणत्या

दिशेस है जलस्त्रोत आहेत ?

12 गावाच्या परिसरात कोणकोणती भूरूपे आढळतात?

13 गाव या ठिकाणी का बसलेले असावे?

14 गावाच्या परिसरात कोणकोणती झाडे आहेत?

15 या परिसरात कोणकोणते प्राणी आहेत?

16 गावातील घरे कोणत्या प्रकारची आहेत घरे बांधण्यासाठी कोणकोणत्या साहित्याचा वापर केला आहे?

17 गावात पिण्याच्या पाण्याची कोणती सुविधा आहे? हे पाणी किती अंतरावरुन आणावे लागते?

18 जलसिंचनाच्या कोणत्या सोयी आहेत?

19 गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? असल्यास नजीकचे प्राथमिक आरोग्य केंद्र किती अंतरावर आहे?

20 गावात शाळा आहे का? असल्यास कोणत्या इयत्तेपर्यंत आहे ?

21 गावात मनोरंजनाची कोणकोणती साधने आहेत?

22 शेतात कोणकोणती पिके घेतली जातात?

23 शेतीला पूरक असे कोणते जोड व्यवसाय केले जातात ?

24 गावात पाळीव प्राणी कोणते आहेत व त्यांचा कशासाठी उपयोग फैला जातो?

25 गावाची लोकसंख्या किती आहे?

26 गावात कोणती दुकाने आहेत?.

27 येथील आठवडा बाजाराचा दिवस कोणता बाजार नसल्यास लोक बाजारासाठी कुठे जातात?

28 गावात शेती शिवाय इतर कोणते व्यवसाय चालतात?

29 लोकांच्या आहारात कोणते पदार्थ असतात?

30 येथील लोकांच्या पोशाखाचे वर्णन करा.

31 गावात कोणते सण व उत्सव साजरे करतात ?

32 संदेशवहनाची कोणती साधने आहेत ?

D 33 गावात इतर कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत?

34 कोणत्या शासकीय योजना येथे राबवल्या जातात? (उदाहरणार्थ सामाजिक वनीकरण, ग्रामसुधार इत्यादी)

कृती 1 ते 3 वरून समजले की, भारतातील बहुसंख्य लोक खेड्यांत राहतात. शहरी भागापेक्षा प्रामीण भागातील लोकजीवन काही अंशी वेगळे असते. एखाया ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन तेथील भौगोलिक स्थिती जाणून घेणे हा क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू असतो.

  • मला हे समजले


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment